Eggs Rate : अंड्याचे दर 600 रुपयांच्या आत; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर महिन्यात अंड्याच्या दराने (Eggs Rate) उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपर्यंत अंड्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगातून व्यक्त केली जात होती. मात्र याबाबत पोल्ट्री उद्योगाची निराशा झाली असून, मागील 8 दिवसांपासून देशातील सर्वच शहरांमध्ये अंड्याच्या दर हे प्रति शेकडा 600 रुपयांपर्यंत खाली आले आहे. आज लखनऊ या एकमेव ठिकाणी अंड्याला 600 रुपये प्रति शेकडा दर मिळाला आहे. तर देशातील उर्वरित सर्व ठिकाणी अंड्याचे दर (Eggs Rate) हे प्रति शेकडा 530 ते 590 रुपये या पातळीवर स्थिर आहेत.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (590), पुणे (590), नागपूर (530), वाराणसी (590), लखनऊ (600), पटना (580), अलाहाबाद (562), कोलकाता (588), कानपुर (552), रांची (581), अहमदाबाद (555) , चेन्नई (580), बंगळुरू (570), विजयवाडा-आंध्रप्रदेश (528). अर्थात मागील आठवड्याच्या शेवटी असलेले 550 ते 630 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर, आज 530 ते 590 रुपये प्रति शेकडापर्यंत घसरले आहेत. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आणखी दर घसरणीची शक्यता

देशातील हिवाळ्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, हवामान विभागानेही चालू फेब्रुवारी महिन्यात अपेक्षेपेक्षा कमीच थंडी राहणार असल्याचे म्हटले आहे. परिणामी, आता थंडी जसजशी देशातील काही भागांमधून काढता पाय घेत आहे. अगदी तसाच परिणाम अंड्याच्या दरावर पाहायला मिळत आहे. मागील पंधरवड्यात थंडीच्या वाढीसोबतच एकदा अंड्याच्या दराने अल्प उसळी घेतली होती. मात्र, अंडी दरातील ही वाढ अधिक काळ टिकू शकली नाही. परिणामस्वरूप अंड्याचे दर पुन्हा माघारी फिरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता चालू महिन्यात देशातील अनेक भागांमधून थंडी काढता पाय घेऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अंड्याचे दर पुन्हा काहीसे घसरल्याचे पाहायला मिळू शकतात.

error: Content is protected !!