Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 20 रुपयांनी घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह अंडी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात राज्यात अंड्याचे दर (Eggs Rate) प्रति शेकडा 430 ते 465 रुपये दरम्यान नोंदवले गेले होते. जे आज 420 ते 445 रुपये प्रति शेकडा प्रतिपर्यंत खाली घसरले आहे. अर्थात राज्यातील अंडी दरात मागील 4 ते 5 दिवसांमध्ये प्रति शेकडा 20 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. तर देशभरातील काही भागांमध्ये देखील अंड्याच्या दरात 20 रुपयांची घसरण दिसून आली आहे. परिणामी, सध्या अंड्याच्या दरात (Eggs Rate) झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अंडी उत्पादक दर घसरणीमुळे चिंतेत आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (445), पुणे (445), नागपूर (420), वाराणसी (453), लखनऊ (467), पटना (455), अलाहाबाद (438), कोलकाता (445), कानपुर (429), रांची (448), अहमदाबाद (435) , चेन्नई (465), बंगळुरू (440), विजयवाडा-आंध्रप्रदेश (400), लुधियाना (400), दिल्ली (412), हैद्राबाद (375), अजमेर (390), सुरत (445), इंदोर (420), चिंतुर-तामिळनाडू (458). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत अंड्याचे दर २० रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

उष्णता वाढीचा दरावर परिणाम

राज्यासह देशातील सर्वच भागांमध्ये सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात सध्या कमाल 44 अंशांपर्यंत पोहचले असून, ज्यामुळे सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. परिणामी, या उष्णतेचा अंड्याच्या दरांवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अंडी दर घसरल्याने पोल्ट्री उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. मागील आठड्याभरात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अंड्याचे दर काहीसे घसरले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यातील मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे दर 445 रुपये प्रति शेकडापर्यंत घसरले आहे. तर दक्षिणेकडील तामिळनाडू या राज्यांमध्ये 465 रुपये प्रति शेकड्यापर्यंत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!