Eggs Rate : अंड्याच्या दरात मोठी घट; पहा… महाराष्ट्रातील आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी घसरण पाहायला मिळतिये. विशेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला उत्तर भारतीय शहरांमध्ये अंड्याचे शेकडा दर हे महाराष्ट्रातील अंडी दराचा तुलनेत अधिक असायचे. मात्र, सध्या याउलट परिस्थिती असून उत्तरेकडील शहरांमध्ये अंडी दरात मोठी घट झाली आहे. तर महाराष्ट्रात मात्र त्या तुलनेने अंडयाचे दर अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देशातील सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर हे प्रति शेकडा 590 रुपयांच्या आत आहे. तर महाराष्ट्रात मात्र मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे दर (Eggs Rate) प्रति शेकडा 610 रुपये इतके आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (610), पुणे (610), नागपूर (570), वाराणसी (583), लखनऊ (583), पटना (585), अलाहाबाद (576), कोलकाता (596), कानपुर (552), रांची (586), अहमदाबाद (575) , चेन्नई (590), बंगळुरू (585), विजयवाडा-आंध्रप्रदेश (546), लुधियाना (521), दिल्ली (540), हैद्राबाद (545), अजमेर (520), सुरत (590), इंदोर (545). अर्थात मागील आठवड्याच्या शेवटी असलेले 550 ते 630 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर, आज 530 ते 590 रुपये प्रति शेकडापर्यंत घसरले आहेत. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

15 ते 25 रुपयांनी घट

दरम्यान, थंडी आणि अंड्याचे दर यांचा परस्पर संबंध आहे. सध्यस्थितीमध्ये देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर कमी झाल्याने, अंड्याच्या मागणीत घट झाली आहे. परिणामस्वरूप त्या ठिकाणी अंडी दरात मोठी घट पाहायला मिळत आहे. मागील अंड्याच्या दराच्या पोस्टमध्ये ‘हॅलो कृषी’ने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी झाल्यास, अंडी दरात आणखी घसरण होऊ शकते. असे म्हटले होते. त्यानुसार उत्तर भारतीय शहरांमध्ये मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा दर अंड्याचे जवळपास 15 ते 25 रुपयांनी घटले आहे. अशातच आता फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये थंडी कमी झाल्यास,अंडी दरात आणखी घट दिसून येऊ शकते.

error: Content is protected !!