Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 20 ते 30 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील अंडी दर (Eggs Rate) घसरणीची मालिका सुरूच आहे. सध्याच्या घडीला दर तीन ते चार दिवसांमध्ये प्रत्येक वेळी अंडी दरात जवळपास 20 ते 40 रुपये प्रति शेकडा इतकी मोठी घसरण नोंदवली जात आहे. अशातच आता 10 मार्च ते 13 मार्च या तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात पुन्हा एकदा जवळपास 20 ते 30 रुपये इतकी घसरण नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये सध्या अंड्याचे दर (Eggs Rate) 412 ते 480 रुपये प्रति शेकड्यापर्यंत खाली आहे. जे 10 मार्च 2024 रोजी 410 ते 500 प्रति शेकडा इतके नोंदवले गेले होते.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (480), पुणे (470), नागपूर (435), वाराणसी (477), लखनऊ (483), पटना (480), अलाहाबाद (462), कोलकाता (490), कानपुर (467), रांची (476), अहमदाबाद (465) , चेन्नई (490), बंगळुरू (465), विजयवाडा-आंध्रप्रदेश (433), लुधियाना (415), दिल्ली (445), हैद्राबाद (410), अजमेर (425), सुरत (480), इंदोर (440), चिंतुर-तामिळनाडू (483). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये चालू आठवड्यात अंड्याचे दर 20 ते 30 रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

आठवडाभरात दुसऱ्यांदा घसरण

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही या अंडी दरात (Eggs Rate) घसरण झाली आहे. चालू आठवड्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा कमी झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील कोलकाता या ठिकाणी सध्या अंड्याला उच्चांकी 490 रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे. यासोबतच महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये देखील दर इतर भागांमध्ये तुलनेने अधिक दर आहे. तर उत्तर भारतीय सर्वच राज्यांमध्ये अंडी काहीसे कमी असलेले पाहायला मिळत आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या काळात तापमान वाढ होत असताना अंडी दर घसरणीला लागतात. अशातच आता यंदा देखील अंडी दर मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच शेकडा 500 रुपयांच्या आता आल्याने, पोल्ट्री उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!