Eggs Rate : अंडी दरात शेकडा 30 ते 50 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशाच्या अनेक भागांमध्ये अंड्याचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति शेकडा इतके असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर घसरले असून ते ४६० ते ५५० रुपये प्रति शेकडा या पातळीपर्यंत खाली घसरले आहे. ज्यामुळे आता अंडी दर (Eggs Rate) घसरल्याने आधीच पोल्ट्री फीड (खाद्य) साठी ओढाताण सुरु असलेल्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (545), पुणे (550), नागपूर (500), वाराणसी (523), लखनऊ (550), पटना (510), अलाहाबाद (530), कोलकाता (510), कानपुर (529), रांची (524), अहमदाबाद (530) , चेन्नई (550), बंगळुरू (520), विजयवाडा-आंध्रप्रदेश (460), लुधियाना (455), दिल्ली (510), हैद्राबाद (460), अजमेर (465), सुरत (560), इंदोर (500), चिंतुर-तामिळनाडू (543). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये चालू आठवड्याच्या सुरूवातीच्या अंडी दराच्या तुलनेत आज अंड्याचे दर ३० ते ५० रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

दोन महिन्यात 150 रुपयांची घसरण

दरम्यान, देशभरातील अंडी दरात मागील पंधरा दिवसांमध्ये सलग तीन वेळा घसरण नोंदवली गेली आहे. ज्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ७०० रुपये प्रति शेकडा या उच्चांकी पातळीवर पोहचलेले अंडी दर, उतरणीला लागून सध्या ४६० ते ५५० रुपये प्रति शेकडा या पातळीपर्यंत खाली आले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला ७०० उच्चांकी पातळीवरील अंडी दराला उतरती कळा लागली होती. जिणे मागील दोन महिन्यांमध्ये प्रति शेकडा जवळपास १५० रुपयांची घसरण नोंदवली आहे. अशातच मागील तीन दिवसांत अंड्यांच्या किंमतीत शेकडामागे सरासरी 30-50 रुपयांची घट झाली आहे. ज्यामुळे अंडी उत्पादकांना आता मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असून, याचा सर्वाधिक परिणाम हा लहान पोल्ट्री व्यावसायिकांवर होणार आहे.

error: Content is protected !!