Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून अंड्याचे दर (Eggs Rate) काहीसे स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा अंडी दरात काहीशी घसरण झाली आहे. महाराष्ट्र वगळता सध्या सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 400 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली घसरले आहे. 15 दिवसांपूर्वी देशभरातील सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 450 ते 535 रुपये दरम्यान होते. जे सध्या 395 ते 465 रुपये प्रति शेकडापर्यंत घसरले आहे. अर्थात सध्या अंड्याचे दर मागील पंधरा दिवसांपूर्वीच्या दरापेक्षा 55 ते 70 रुपये प्रति शेकड्याने घसरले आहेत. ज्यामुळे आता पुन्हा एकदा अंडी दर (Eggs Rate) घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (465), पुणे (465), नागपूर (430), वाराणसी (473), लखनऊ (477), पटना (465), अलाहाबाद (457), कोलकाता (460), कानपुर (452), रांची (476), अहमदाबाद (445) , चेन्नई (465), बंगळुरू (440), विजयवाडा-आंध्रप्रदेश (400), लुधियाना (400), दिल्ली (440), हैद्राबाद (395), अजमेर (400), सुरत (460), इंदोर (420), चिंतुर-तामिळनाडू (458). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत अंड्याचे दर 55 ते 70 रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

उष्णता वाढीचा दरावर परिणाम

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यासह देशभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. अर्थात 30 ते 35 अंशांच्या दरम्यान असलेले राज्यातील तापमान सध्या 40 ते 44 अंशांपर्यंत पोहचले आहे. ज्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने, अंड्याच्या दरांवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अंडी दर घसरल्याने पोल्ट्री उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. सध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अंड्याचे दर अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यातील मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये अंड्याचे दर 465 रुपये प्रति शेकडा या सर्वोच्च पातळीवर आहेत. तर दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये अंडी दर 400 रुपये प्रति शेकड्यापर्यंत खाली आले आहे.

error: Content is protected !!