हॅलो कृषी ऑनलाईन : आयशर ट्रॅक्टर (Eicher 330) ही देशातील ट्रॅक्टर उद्योगातील आघाडीची कंपनी असून, शेतकऱ्यांमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे. कंपनीने देशातील शेतकऱ्यांसाठी 18 ते 60 एचपीच्या रेंजमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने शेतकऱ्यांसाठी आयशर 330 या दमदार ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हा ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत त्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली आहे. दमदार आणि दणगट असलेला हा ट्रॅक्टर अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने शेती संबंधित रोटाव्हेटरसह (Eicher 330) अन्य अनेक उपकरणे चालवता येतात.
‘आयशर 330’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये (Eicher 330 Preferred By Farmers)
आयशर कंपनीचा ‘आयशर 330’ (Eicher 330) हा ट्रॅक्टर तीन सिलेंडर, तीस हॉर्स पावर क्षमतेसह 2272 सीसी पावरफुल इंजिनसह येतो. या ट्रॅक्टरमध्ये इनलाइन इंधन पंप देण्यात आला आहे. ट्रॅक्टरला सिम्पसन कंपनीचे इंजिन दिले आहे. कंपनीने ट्रॅक्टरला कुलींगसाठी वाटर कुलिंग सिस्टिम देण्यात आले आहे. यासोबतच हे ट्रॅक्टर कॉस्टंट मॅश आणि स्लाइडिंग मॅशच्या संयोजनासह सेंटर शिफ्ट प्रकार ट्रान्समिशन सोबत जोडलेला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर दिले आहेत. या ट्रॅक्टरचा कमाल ताशी वेग 29.83 किमी प्रति तास इतका आहे.
आयशर हा ट्रॅक्टर सिंगल क्लचसह येतो. तसेच त्याला कंपनीने 12 वॅट आणि 75 एएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. आयशर 330 हा ट्रॅक्टर ऑइल इमरस्ड ब्रेकसह येतो. हे ब्रेक जास्त काळ टिकतात आणि मजबूत पकड देतात. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल पावर स्टेरिंग दिले आहे. ज्यामुळे चालकाला आरामदायी अनुभव मिळतो. या ट्रॅक्टरमध्ये तीन पॉईंट लिंकेजसह एडीसीसी प्रकारातील हायड्रॉलिक्स देण्यात आले आहे. या हायड्रोलिकची उचलण्याची क्षमता बाराशे किलो इतकी आहे. तीस एचपी श्रेणीतील ट्रॅक्टरमध्ये उचलण्याची क्षमता खूप चांगली मानली जाते.
किती आहे किंमत?
कंपनीने ‘आयशर 330’ या ट्रॅक्टरची किंमत चार लाख 84 हजार 330 रुपये इतकी ठेवली आहे. ही शोरूम किंमत असून, त्यात वेगवेगळ्या ठिकाणी बदल होऊ शकतो. आयशर 330 ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम व आर्थिक बजेट कमी असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने या किमतीतले हे उत्तम ट्रॅक्टर आहे. अर्थात शेतकऱ्यांना मोठ्या ट्रॅक्टर आणि मिनी ट्रॅक्टर यातील सुवर्णमध्य म्हणून ‘आयशर 330’ हा एक चांगला पर्याय आहे.