Eicher Tractors : आयशर कंपनीच्या ‘या’ ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक शेतकरी दमदार ट्रॅक्टर म्हणून आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरांना (Eicher Tractors) पसंती देतात. कंपनीच्या सर्वच श्रेणीतील ट्रॅक्टरनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागत, नांगरणी, पेरणी, शेतमालाची वाहतूक अशा एक ना अनेक कामासाठी दररोज ट्रॅक्टरची गरज पडते. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर देशातील अनेक शेतकऱ्यांचा भरोसा जिकंलेल्या आयशर कंपनीचा “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. दणगट आणि शक्तीशाली असलेला हा ट्रॅक्टर पाहताच रुबाबदार दिसतो. आज आपण आयशर कंपनीच्या “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” ट्रॅक्टरबद्दल (Eicher Tractors) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे विशेषतः? (Eicher Tractors For Farmers)

आयशर कंपनीचा “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” या ट्रॅक्टरला (Eicher Tractors) कंपनीने 3300 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडर दिलेले आहेत. तसेच त्याला वॉटर कुलिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे. हा ट्रॅक्टर 49 एचपी क्षमतेचा असून, त्याची जास्तीत जास्त पीटीओ पॉवर ही 42 एचपी इतकी आहे. आयशर कंपनीच्या या ट्रॅक्टरला कंपनीने 29.32 kmph इतका स्पीड दिलेला आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला 1650 किलोग्रॅम इतके वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. हा ट्रॅक्टर कॉम्बी बॉल 3 पॉइंट लिकेंजसह उपलब्ध करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन हे 2081 किलोग्रॅम इतके आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 1975 MM व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

आयशर 551 हाइड्रोमॅटिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

आयशर कंपनीचा “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” या ट्रॅक्टरला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. तसेच या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिंगल आणि ड्युअल टाईप क्लच पाहायला मिळतो. त्याला पार्शिअली कॉन्स्टन्ट मेश ट्रांसमिशन देण्यात आले आहे. आयशर कंपनीच्या “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” या ट्रॅक्टरला मल्टी डिस्क ऑइल इमर्जड ब्रेक देण्यात आला आहे. जो चालकाला प्रसंगी सुरक्षितता प्रदान करतो. याशिवाय हा ट्रॅक्टर सिक्स स्प्लिनेड शाफ्ट टाइप पॉवर टेकऑफसह येतो. जो 540 आरपीएम निर्मिती करू शकतो. या ट्रॅक्टरला कंपनीने 2WD ड्राइव सिस्टिम दिलेली आहे. तसेच या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00 x 16 आकाराचे तर मागील बाजूस 14.9 x 28 आकाराचे टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

आयशर कंपनीने आपल्या “आयशर 551 हाइड्रोमॅटिक” या ट्रॅक्टरची शोरूम किंमत ही 6.80 लाख ते 7.10 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. जी भारतीय शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्धारित करण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची किंमत देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये रोड टॅक्स आणि आरटीओ रजिस्ट्रेशन फी मुळे वेगवेगेळी राहू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरला 2 वर्षांची वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!