शेतकऱ्यांसाठी ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना, सरकार देतंय ‘इतके’ रुपये अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एक शेतकरी, एक डीपी योजना : राज्य सरकारची ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रान्सफार्मर या माध्यमातून देण्यात येतो. शेतकऱ्यांना नियमितपणे आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे आहे.

असा करा मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज

तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करा. इथे सरकारच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येते तसेच तुम्ही अगदी सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकता. यासोबत रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी सातबारा उतारा डाउनलोड करणे आदी सेवा मोफत दिल्या जातात. तेव्हा आजच Hello Krushi App डाउनलोड करा.

सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मर मिळवण्याकरिता सात हजार रुपये प्रति एचपी इतकी रक्कम भरणे गरजेचे असते. त्यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपीचा खर्च करणे गरजेचे असते. ही रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्याकरिता जो काही जास्तीचा खर्च येतो तो राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकरी सात हजार रुपये आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एचपी इतका खर्च आहे.

यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड तसेच या योजनेचा लाभ हा शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे सातबारा उतारा आणि आठचा उतारादेखील लागतो. लाभार्थी जर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असतील तर अशा शेतकऱ्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक असणेदेखील गरजेचे असून पासबुकची प्रतदेखील लागणार आहे. या गोष्टी असतील तर या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे.

error: Content is protected !!