Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षांत 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना (Eknath Shinde) दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून, सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली आहे.

याशिवाय राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Eknath Shinde) प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे. तर कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून, याबाबतही लवकरच तोडगा निघेल, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

कृषी विभागामार्फत 15 हजार 40 कोटी (Eknath Shinde On Farmers)

अवकाळी पाऊस, गारपीट आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. अनेक खात्यांशी समन्वय साधून, शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5 हजार 190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्राच्या पथकाकडून दुष्काळ पाहणी

राज्यात यंदा सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन केंद्राच्या पथकाने पाहणी केली आहे. 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना 2 हजार 578 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणी पत्र पाठवले आहे. ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे. त्यामुळे केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीला शाश्वत शेतीकडे कसे नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असे शेतीचे मॉडेल कसे विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करेल. असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आज सांगितले आहे.

error: Content is protected !!