Eknath Shinde : बांबू, टसर रेशीम शेतीमुळे रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन (Eknath Shinde) वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुख्यमंत्र्यांच्या गावात बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याशिवाय त्यांनी यावेळी दरे येथे ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ देखील केला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील उपस्थित होते.

‘मी उंटावरून शेळ्या हाकत नाही’ (Eknath Shinde Bamboo Tussar Sericulture)

या वेळी बांबू मूल्यवर्धन केंद्राच्या उदघाटनप्रसंगी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. आपण उंटावरून शेळ्या हाकत नसल्याचे त्यांनी यावेळी कुणाचेही नाव न घेता म्हटले आहे. आपण सर्वसामान्यांसाठी काम करत असून, या केंद्रामुळे शेतकरी, महिला, तरुणांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

‘टसर रेशीम शेती वरदान ठरणार’

दरम्यान, टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे की, जंगल आणि वनांमध्ये महिला शेतकरी व तरुणांना टसर रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. यात झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरणी करायची नाही, पाण्याची आवश्यकता नाही, औषध फवारणी नाही त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतकऱ्यांसाठी टसर रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!