Eknath Shinde : आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण देणार – एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य पद्धतीने विक्री (Eknath Shinde) करता यावी. त्यांना शेतमालाचे मार्केटिंग करत योग्य बाजारपेठ मिळवता यावी. आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साधता यावी. या उद्देशाने राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाशीम येथे उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र वाशीम आणि आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार (Eknath Shinde Farmers Will Be Trained)

वाशिम जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह शेतमालाच्या मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी कोल्ड स्टोरेज (शीतगृह), क्लिनिंग(शेतमाल स्वच्छताकरण), ग्रेडीग (प्रतवारी), आणि पॅकेजिंगची व्यवस्था या केंद्रामध्ये सुरु असणार आहे.असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हटले आहे. या कार्यक्रमाला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, आमदार किरण सरनाईक, महादेव जानकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

30 हजार शेतकरी संघटित होणार

शेतकऱ्यांसाठीच्या या केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 5 कोटी 84 लाख निधी मिळाला आहे. याशिवाय शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचे तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देणे, नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. केंद्राची क्षमता प्रीकूलिंग 10 मे.टन, कोल्ड स्टोरेज 40 मे.टन, रायपेनिंग चेंबर 15 मे.टन, ग्रेडिंग अँड पॅकिंग, 2 व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण 90 शेतकरी उत्पादक कंपनी, 2 हजार 214 शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. परिणामी, आता एकूण 30 हजार 210 शेतकऱ्यांना एकत्रित करण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!