Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी केली हळदीची काढणी; रोटाव्हेटरही फिरवला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गावाकडे गेल्यानंतर अनेकदा शेतात रमल्याचे पाहायला मिळते. मुख्यंमत्री शिंदे हे सध्या आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले असून, त्यांनी शेतात रोटाव्हेटरने शेताची मशागत केली. तसेच हळद पिकाची काढणी देखील केली आहे. गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. असे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

केली हळदीची काढणी (Eknath Shinde Harvesting Of Turmeric)

यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात मुख्यंमत्री आपल्या दरे या गावी गेले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक दिवसीय सुट्टी घेत गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेला हजेरी लावली. तसेच ते गावच्या मातीमध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. मुख्यंमत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या दरे येथील गावी शेतात औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या हळदीची काढणी सुरु असून, ते स्वतः हळदीची काढणी करताना दिसून आले आहे. त्यांनी याबाबतचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

शेतीकामातून अलौकिक आनंद

गावी शेतात काम करून आपल्याला एक अलौकिक आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसे यांच्याशी असलेले नाते याचे आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. माणूस आपल्या गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बांबू लागवड मिशन मोडवर

“हे एक झाड आहे याचे माझे नाते..वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते.. मला आवडतो याच्या फुलांचा वास.. वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास..” या सुप्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या ओळींचा दाखला देत गावाविषयी, आपली माती-आपले माणसे याविषयी महती व्यक्त केली आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देताना त्यांनी आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत असून, जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. असेही म्हटले आहे.

error: Content is protected !!