Electric Bull : शेतकऱ्यांनो कामाचं टेन्शन मिटलं, बाजारात आलाय इलेक्ट्रिक बैल; काय आहे हा प्रकार अन हा बैल कोणकोणती कामे करतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Electric bull : सध्या शेती तंत्रज्ञानयुक्त होत चालली आहे अनेक जण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. पहिल्या काळातील लोक अंग मेहनतीने शेती करत होते. मात्र आताच्या काळातील लोक अंग मेहनतीने नाही तर डोक्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य पद्धतीने शेती करतात आणि उत्पादन देखील जास्त घेतात. बाजारात दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतं. सध्या देखील बाजारामध्ये आता एक इलेक्ट्रिक बैल आला आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील कोणतीही कामे करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इलेक्ट्रिक बैल म्हणजे नेमकं काय आहे? याच्या मदतीने शेतातील कामे कशी करायची हा प्रश्न पडणे सहाजिकच आहे मात्र याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे विकत घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

मागच्या दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले होते. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या शहरातील लोक खेड्यापाड्यांमध्ये कोरोनाच्या भीतीने आली. त्याचबरोबर काही लोकांनी शहरातून गावाकडे येऊन नवनवीन उद्योग चालू केले. काहींनी शेती करण्यास सुरुवात केली तर काहींनी काही तंत्रज्ञानाचाही शोध लावला आता. अशाच एका व्यक्तीने कोरोना काळात घरी येऊन शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट तंत्रज्ञान बनवल आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक बैल. तुम्हाला हा बाईक विकत घ्यायचा असेल तर Hello Krushi मोबाईल अँपवर अतिशय कमी किंमतीत तुम्ही तो खरेदी करू शकता.

शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर सध्या बैल देखील शेतात कामासाठी मिळत नाहीत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या व्यक्तीने इलेक्ट्रिक बैल बनवला आहे. या व्यक्तीचे नाव तुकाराम सोनवणे असे आहे. तुकाराम सोनवणे यांनी लॉकडाऊनमध्ये घरी येऊन शेतकऱ्यांसाठी एक इलेक्ट्रिक बैल बनवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे अगदी सहजपणे होणार आहेत. शेतकऱ्यांना जास्त परिश्रम करण्याची देखील गरज नाही या बैलाला चार्जिंग केल्यावर शेतकरी त्याच्याकडून सर्व कामे करून घेऊ शकतात.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

याचा नेमका फायदा काय?

शेतकऱ्याने बनवलेल्या इलेक्ट्रिक बैलाचे खूप फायदे आहे. यामध्ये शेतकरी कमी वेळामध्ये हा इलेक्ट्रिक बैल कोळपणी, खुरपणी डवरणी तसेच फवारणी इत्यादी कामे सहजरीत्या करत आहे. तुकाराम सोनवणे यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असल्याने त्यांना हा इलेक्ट्रिक बैल बनवण्याची कल्पना सुचली आणि त्या कल्पनेतूनच त्यांनी त्याची वेगवेगळे पार्ट मागवले आणि हा इलेक्ट्रिक बैल शेतकऱ्यांसाठी बनवला आहे.

या इलेक्ट्रिक बैल ची किंमत किती

तुम्हाला देखील हा इलेक्ट्रिक बैल घ्यायचा असेल तर याची किंमत जास्तही नाहीत तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या किमतीत तुम्ही हा इलेक्ट्रिक बैल खरेदी करू शकता. कृषीगती या कंपनीने हा इलेक्ट्रिक बैल विक्रीसाठी देखील काढलेला आहे. या बैलाची किंमत या कंपनीने दोन लाख 75 हजार रुपये ठेवली आहे.

चार्जिंग किती वेळ टिकते

बऱ्याचदा कोणत्याही इलेक्ट्रिक चार्जिंगच्या वस्तू घेतल्या तर आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो म्हणजे त्याची चार्जिंग किती वेळ टिकते आणि ही सहाजिकच गोष्ट आहे बऱ्याचदा आपण काही इलेक्ट्रिक काही गोष्टी खरेदी करतो यावेळी त्या गोष्टींना प्रॉब्लेम देखील येतात. त्यांची चार्जिंग टिकत नाही मात्र या इलेक्ट्रिक बैलाला तुम्ही एकदा चार्जिंग केल्यानंतर तो चार तास तुमच्या रानामध्ये काम करू शकतो. त्यामुळे एकदा चार्जिंग केल्यानंतर तुम्हाला चार तास कसलेही टेन्शन राहणार नाही त्याच्या मदतीने तुम्ही सर्व कामे करू शकता.

या ठिकाणी खरेदी करता येईल इलेक्ट्रिक बैल

शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी नवनवीन जुगाडे शेतीमध्ये बनवत असतात यासाठी. आम्ही एक खास बनवले आहेत ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांनी बनवलेली जुगाडे खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला एक सोपे काम करायचा आहे तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे. हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टाल केल्यानंतर ओपन करून त्या ठिकाणी शेतकरी दुकान असा ऑप्शन दिसेल यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही शेती संबंधित कोणतीही अवजारे त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता. त्यामुळे लगेचच हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करा.

error: Content is protected !!