Electric Tractor: लवकरच बाजारात येणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; काय होणार फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आता लवकरच शेतकर्‍यांना शेतात मिळेल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor). पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्‍यांसाठी आता दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) थोडा महाग आहे, परंतु लवकरच इतर कंपन्याही बाजारात प्रवेश करतील आणि स्पर्धेमुळे किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे फायदे (Electric Tractor)

  • डिझेल-पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च
  • प्रदूषणमुक्त (Pollution Free)
  • कमी आवाज
  • मेंटेनन्स कमी (Low Maintenance)
  • शासनाकडून सबसिडी (Government Subsidy) मिळण्याची शक्यता

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) अद्याप शेतात नांगरणीसाठी पूर्णपणे सक्षम नाहीत, तरीही ते वाहतूक (Transportation) जसे पिके  बाजारात नेण्यासाठी आणि इतर शेतीकामांसाठी (Agriculture Work) उपयुक्त ठरतील. हे तंत्रज्ञान निश्चितच कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल आणि शेतकर्‍यांच्या जीवनात सुधारणा करेल.

error: Content is protected !!