Electricity Supply : शेतकऱ्यांना 12 तास वीज देणार – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांना सरकारने पुरेसा व सुरळीत वीज पुरवठा (Electricity Supply) द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून येत्या काळात शेतीसाठीचे फीडर सौर उर्जेवर टाकले जाणार आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा 12 तास विद्युतपुरवठा (Electricity Supply) उपलब्ध करून दिला जाईल. असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

“गोसीखुर्द प्रकल्प हा राज्यातील शेतीच्या सिंचनासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता 2024 अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित (Agriculture Pump Electricity Supply In Maharashtra)

राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मागील 35 वर्षांपासून अपूर्ण आहे. धरणात पाणी असले तरी ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्यासाठी लागणाऱ्या वितरिकांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आता फडणवीस यांच्या या आश्वासनानंतर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शून्य टक्के व्याजाने पीककर्ज – पवार

राज्य सरकारने यावर्षीपासून सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली असून, त्याद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 954 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्ज, पूरग्रस्तांना दुपटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!