Escort Kubota Tractor Sale : मार्च महिन्यात ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ ट्रॅक्टरच्या विक्रीत 16.7 टक्के घसरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ (Escort Kubota Tractor Sale) ही ट्रॅक्टर निर्माता कंपनी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. कंपनीने देखील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यानुसार आपले विविध रेंजचे ट्रॅक्टर बाजारात आणले आहे. अशातच आता ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीची मार्च 2024 या महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. कंपनीने गेल्या मार्च महिन्यात एकूण ट्रॅक्टर विक्रीत 16.7 टक्के घसरण नोंदवली आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात भारतीय कृषी क्षेत्रावर अल-निनोचा असलेला निराशाजनक प्रभाव, ट्रॅक्टर विक्रीत घट होण्यास कारणीभूत ठरल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांचे अर्थकारण थांबले (Escort Kubota Tractor Sale In March 2024)

‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ या ट्रॅक्टर निर्माता कंपनीच्या आकडेवारीनुसार, मार्च 2024 या महिन्यात कंपनीने देशातंर्गत आणि निर्यात विक्रीद्वारे (Escort Kubota Tractor Sale) एकूण 8,587 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या मार्च 2023 या महिन्यात 10,305 ट्रॅक्टर विक्री इतकी नोंदवली गेली होती. अर्थात कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत मार्च महिन्यात 16.7 टक्के इतकी घसरण नोंदवली गेली आहे. देशातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न न मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण थांबल्याने त्याचा थेट परिणाम ट्रॅक्टर खरेदीवर होऊन घसरण नोंदवली गेली आहे.

देशांतर्गत विक्रीत 16.1 टक्के घट

एस्कॉर्ट्स कुबोटाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2024 या महिन्यात कंपनीने देशातंर्गत बाजारात 8,054 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या मार्च 2023 या महिन्यात कंपनीने 9,601 ट्रॅक्टरची विक्री केली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यात कंपनीच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत 16.1 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.

निर्यात विक्रीत 24.3 टक्के घट

एस्कॉर्ट्स कुबोटाच्या आकडेवारीनुसार, कंपनीला गेल्या महिन्यात निर्यात विक्रीत देखील घसरण सहन करावी लागली आहे. मार्च 2024 महिन्यात कंपनीने भारताबाहेर एकूण 533 ट्रॅक्टरची निर्यात केली आहे. जी मागील वर्षीच्या मार्च 2023 या महिन्यात 704 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात कंपनीच्या ट्रॅक्टर निर्यात विक्रीत मागील मार्च महिन्यात 24.3 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.

error: Content is protected !!