हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने आपली ‘डिसेंबर २०२३’ या महिन्यातील ट्रॅक्टर विक्रीची (Escorts Kubota Sale) आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत आणि बाहेरील देशांमध्ये केलेली निर्यात मिळून एकत्रिपणे 4,536 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 5,573 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत (Escorts Kubota Sale) 18.6 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
कंपनीने यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत बाजारात एकूण 4,131 ट्रॅक्टरची विक्री (Escorts Kubota Sale) केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 4,979 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीच्या देशातंर्गत ट्रॅक्टर विक्रीत जवळपास 17 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर निर्यात विक्रीचा विचार करता कंपनीने यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात ट्रॅक्टर निर्यात करण्यात मोठी आपटी घेतली आहे. डिसेंबर 2023 या महिन्यात केवळ 405 ट्रॅक्टर निर्यात करण्यात कंपनीने यश आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत डिसेंबर 2022 या महिन्यात कंपनीने एकूण 594 ट्रॅक्टर निर्यात केली होती. अर्थात यावर्षी कंपनीच्या ट्रॅक्टर निर्यातीत 31.8 टक्के इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे.
वार्षिक विक्रीमध्ये घट (Escorts Kubota Sale Down 18.6% In December)
एस्कॉर्ट्स-कुबोटा लिमिटेड ही (पूर्वीची एस्कॉर्ट्स लिमिटेड) एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कृषी यंत्रसामग्री विशेषतः ट्रॅक्टर, बांधकाम यंत्रे, साहित्य हाताळणी आणि रेल्वे उपकरणे या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून, तिचे हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे मुख्यालय आहे. जगातील 40 हून अधिक देशामध्ये या कंपनीचा विस्तार आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ ट्रॅक्टर कंपनीने एकूण 74,605 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 78,525 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षीच्या आर्थिक वर्षात कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीत आतापर्यंत 5 टक्के घट नोंदवली गेली आहे. दरम्यान यावर्षी आतापर्यंत कंपनीच्या देशातंर्गत ट्रॅक्टर विक्रीत 2.6 टक्के तर निर्यात विक्रीत 32.5 टक्के इतकी घट पाहायला मिळाली आहे.