Escorts Steeltrac Tractor : 3 लाखांमध्ये मिळतोय ‘हा’ ट्रॅक्टर; वाचा… काय आहे वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची (Escorts Steeltrac Tractor) मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. ट्रॅक्टर असेल तर शेतकरी शेतीची अनेक मोठी कामे सोपी करू शकतात. मात्र, काही शेतकऱ्यांकडे जमीन कमी असेल किंवा मग काही शेतकऱ्यांचे बजेट छोटे असेल तर अशा शेतकऱ्यांना लो बजेट ट्रॅक्टरची आवश्यकता असते. देशातील अनेक ट्रॅक्टर निर्माता कंपन्या आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी छोट्या ट्रॅक्टरची निर्मिती करत असतात. विशेष म्हणजे छोट्या ट्रॅक्टरची किंमत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट लक्षात घेऊन निश्चित केलेली असते. आज आपण ‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’बाबत (Escorts Steeltrac Tractor) अधिक जाणून घेणार आहोत.

‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’बद्दल (Escorts Steeltrac Tractor For Farmers)

‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’ (Escorts Steeltrac Tractor) हा शेतकऱ्यांसाठी 895 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. ज्यास वॉटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरचे इंजिन 18 हॉर्स पॉवरची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाइप एयर फिल्टर दिला आहे. ज्यामुळे धूळ, माती यापासून इंजिनचे संरक्षण होते.

एस्कॉर्ट्सच्या या ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पॉवर 15.4 एचपी इतकी आहे. ज्यामुळे शेतीची सर्व अवजारे सुरळीतपणे चालवली जाऊ शकतात. या छोट्या ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएमची निर्मिती करते. ‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’ला कंपनीने 450 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता दिलेली असून, या ट्रॅक्टरचे वजन 910 किलोग्रॅम इतके ठेवण्यात आले आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला 2530 एमएम लांबी, 1040 एमएम रुंदीसह 1524 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’चे फीचर्स

‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’ला मॅन्युअल स्टीयरिंग देण्यात आली आहे. ज्यामुळे चालकाला ट्रॅक्टर चालवताना आरामदायी अनुभव मिळतो. कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे. हा छोटा ट्रॅक्टर सिंगल क्लचमध्ये उपलब्ध असून, तो त्यास सिंक्रोमेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय डिस्क ब्रेक्स दिलेला आहे.

कंपनीकडून या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 25 किमी प्रति तास आणि मागील बाजूस 4.53 किमी प्रति तास इतका वेग देण्यात आला आहे. तसेच कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 18 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. हा एस्कॉर्ट ट्रॅक्टर एमआरपीटीओ टाइप पावर टेकऑफसह उपलब्ध आहे. जो 540 आरपीएमची निर्मिती करतो. हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 5.00 x 12 आकारात तर मागील बाजूस 8.0 x 18 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

कंपनीने आपल्या ‘एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर’ची शोरूम किंमत 2.98 लाख ते 3.35 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असतो. ज्यामुळे या ट्रॅक्टरची विविध राज्यांमधील किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2 वर्षांची वॉरंटी दिली आहे.

error: Content is protected !!