Ethanol Ban : शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काय बिघडते; शेट्टींचा केंद्र सरकारला टोला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर पूर्णतः बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हे केंद्र सरकारला उशीर सुचलेले शहाणपण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले (Ethanol Ban) तर काय बिघडते असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

देशात इथेनॉल निर्मिती (Ethanol Ban) करणारे सुमारे 355 कारखाने असून, त्यापैकी महाराष्ट्रात 112 कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती होते. इथेनॉल निर्मितीसाठी आतापर्यंत सात ते आठ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. राज्यातील साखर उद्याोगाने तेल कंपन्यांना गतवर्षी 120 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला होता. सध्या राज्याची इथेनॉल निर्मिती क्षमता 300 कोटी लिटरपर्यंत गेली आहे. मात्र सरकारच्या इथेनॉल बंदीच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसणार होता. इतकेच नाही तर राज्यासह देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी करणारा निर्णय होता. मात्र आता केंद्र सरकारने शहाणपण दाखवत निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे ‘सरकारला हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

हे शेतकरी संघटनांचे यश (Ethanol Ban Raju Shetti Reaction)

केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून 2023-24 मध्ये उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करू नये, असे आदेश साखर कारखान्याला दिले होते. मात्र 15 दिवसांतच सरकारने ‘यु टर्न’ घेतला आहे. हे देशातील शेतकरी संघटनांचे यश आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला शंभर टक्के यश आलेले नाही. कारण यावर्षी 34 ते 35 लाख टन साखरेला इथेनॉलकडे वळवायचे होती. पण त्यापैकी निम्म्या म्हणजेच 17 लाख टनाला परवानगी देण्यात आली आहे. साखरेचा हंगाम संपण्याआधी या निर्णयाचा फेरविचार करण्याचेही आश्वासन सरकारने दिले आहे. आधी ठरल्याप्रमाणे इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी. एका बाजूला इतर पिकांना भाव मिळत नसताना इथेनॉलच्या उत्पादनाने जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!