Ethanol Ban : सरकारचा निर्णय दुर्दैवी; शेतकऱ्यांवर दुरोगामी परिणाम होईल – शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती (Ethanol Ban) करण्यास बंदी घातल्याने, या निर्णयामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दुरोगामी होतील. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. याशिवाय शेतकऱ्यांसासह (Ethanol Ban) अनेकांचा रोजगार हा इथेनॉल निर्मिती उद्योगावर अवलंबून आहे. उद्योगात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सर्व साखर कारखान्यांना एक अधिसूचना जारी करत इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Ban) उसाचा वापरू नये. असे निर्देश दिले आहेत. मात्र सरकारने मोठ्या गाजावाजा करत इथेनॉल उद्योगाला प्रोत्साहन देत असल्याचे अनेकदा म्हटले आहे. त्यानुसार अनेकांनी कर्जाऊ रक्कम उभारून मोठ्या गुंतवणुकीतून प्रकल्प उभारले आहेत. सरकारकडून इथेनॉल विक्रीचे दर वाढवण्यात येणार आहे, अशीही चर्चा सुरु होती. मात्र सरकारने आधी साखर निर्यातीवर बंदी घातली आणि इथेनॉल निर्मिती बंद केली. त्यामुळे सरकारच्या या निर्याणामुळे साखर उद्योगाची दुविधा मनस्थिती झाली आहे. याचा शेतकऱ्यांवरही अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

काय आहे सरकारचा आदेश? (Ethanol Ban Raju Shetti Statement)

केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सर्व साखर कारखान्यांना 2023-24 च्या हंगामासाठी उसाचा रस, सिरप यांच्या वापारातून इथेनॉल निर्मिती करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे. मात्र बी-हैवी मोलासेसच्या तेल कंपन्यांना इथेनॉल पूर्तता सुरु राहील. साखरेचे देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. अशा स्पष्ट शब्दांत सरकारकडून कारखान्यांना निर्देश देण्यात आले आहे.

error: Content is protected !!