Ethanol : इथेनॉलनिर्मिती उद्योगाला ‘अच्छे दिन’; ‘या’ कंपन्यांना विक्रीसाठी निविदा मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख तीन इथेनॉल निर्मिती (Ethanol) कंपन्यांना सरकारकडून एकत्रितपणे 1138 कोटी रुपयांच्या विक्री निविदा मंजूर करण्यात आल्या आहे. यामध्ये भटींडा केमिकल्स लिमिटेडकडून (बीसीएल) 561 कोटी रुपयांचा, गुलशन पॉलिओल्स लिमिटेडकडून 571.5 कोटी रुपयांचा तर डिस्‍टिलरी ऑइल मार्केटिंग कंपनीकडून 6.73 कोटी रुपयांचा इथेनॉल पुरवठा (Ethanol) इंधन कंपन्यांना केला जाणार आहे. यामुळे आता इथेनॉल उद्योगाला चालना मिळणार असून, अप्रत्यक्षपणे मका, धान्य उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

देशातील इंधन कंपन्यांना 561 कोटी रुपयांचा इथेनॉल पुरवठा (Ethanol) करण्यासाठी भटींडा केमिकल्स लिमिटेड (बीसीएल) या इथेनॉल निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कंपनी नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या काळात इंधन कंपन्यांना जवळपास 8.20 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहे. बीसीएल इंडस्‍ट्रीज या कंपनीसह तिची उपकंपनी असलेल्या डिस्‍टिलरी ऑइल मार्केटिंग कंपनी या कंपनीने सरकारच्या निविदेत भाग घेतला होता. त्यामुळे डिस्टिलरी या कंपनीलाही 10 हजार लिटर इथेनॉलचा (Ethanol) पुरवठा करण्याची सरकारकडून परवानगी मिळाली आहे. या परवानगीअंतर्गत डिस्टिलरी कंपनीकडून 6.73 कोटी रुपयांची इथेनॉल विक्री इंधन कंपन्यांना केली जाणार आहे. गुलशन पॉलिओल्स लिमिटेडला या अन्य एका कंपनीलाही 571.5 कोटी रुपयांची निविदा सरकारने मंजूर केली आहे. त्यानुसार आता गुलशन पॉलिओल्स लिमिटेड केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला ऑक्टोबर 2024 पर्यंत 89 हजार 404 लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार आहे.

उद्योगाला उभारी मिळणार (Ethanol Production In India)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशातील इंधन कंपन्यांनी इथेनॉलच्या किमतींमध्ये वाढ करावी. या मागणीसाठी ग्रेन इथेनॉल मॅनुफॅक्चरर्स असोशिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात असोशिएशनने इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ करण्यासह इथेनॉल निर्मिती उद्योगातील समस्या सरकार दरबारी मांडल्या होत्या. त्यामुळे आता सरकारने इथेनॉल उद्योगाला चालना देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या दोन कंपन्यांना निविदा मंजुर करण्यामुळे इथेनॉल निर्मिती उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे.

error: Content is protected !!