Ethanol Crops : ‘या’ पिकांपासून होते इथेनॉल निर्मिती; हमीभाव मिळण्यास होते मदत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या इथेनॉल निर्मितीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Crops) करण्यास बंदी घातली. मात्र साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अल्पावधीतच ही बंदी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र अशी कोणकोणती पिके आहेत. ज्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती होते. आणि त्यातून शेतकऱ्यांना (Ethanol Crops) फायदा होऊ शकतो. याबाबतचा हा थोडक्यात आढावा…

देशात गेल्या काही वर्षात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापर मोठ्या प्रमाणात (Ethanol Crops) वाढला आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने सरकारकडून इथेनॉल निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने पेट्रोल आणि डिझेलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढवले आहे. तसेच हवाई वाहतुकीच्या इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढवला आहे. हे इथेनॉल जैवइंधन मुख्यत्वे साखर, मका, बाजरी आणि इतर स्टार्चयुक्त पीकांपासून बनवले जाते. यामुळे इंधन आयात कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरणाचे नुकसानही कमी होते.

इथेनॉल निर्मितीसाठीचे पिके (Ethanol Crops Help To Get Guaranteed Price)

1. ऊस : भारतात ऊस हे इथेनॉल उत्पादनाचे प्रमुख स्रोत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही उसापासून साखर उत्पादन घेणारी आघाडीची राज्ये आहेत. परंतु ऊस हे मोठ्या प्रमाणात पाणी वापरणारे पीक आहे. त्यामुळे त्याचे व्यापक वापरामुळे पाणी संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
2. मका: मका पाणी वापरासाठी तुलनेने नाजूक पीक असून, इथेनॉल उत्पादनासाठी उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही मका उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत.
3. बाजरी: बाजरी दुष्काळ प्रवृत्त क्षेत्रांसाठी योग्य पीक असून, इथेनॉल उत्पादनासाठी देखील वापरता येते. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही बाजरी उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत.
4. इतर पीक: तांदूळ, ज्वारी, तूर, टॅपिओका आणि नारळ यासारख्या इतर स्टार्चयुक्त पिकांचा देखील इथेनॉल उत्पादनासाठी वापर केला जाऊ शकतो.

इथेनॉल निर्मितीचे फायदे :

या पिकांपासून इथेनॉल उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होते. इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणारे पीक हे वळू, पेंढा आणि इतर अवशेपांचे रुपांतर ऊर्जा स्रोतात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. जैवइंधन उत्पादनामुळे पाणी आणि जमिनीवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दीर्घकालीन टिकाऊ शेतीला चालना मिळते. देशात इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि शेतकऱ्यांना अनुदान देणे ही सरकारची काही पावले आहेत. इथेनॉल उत्पादनाच्या वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दिशेनेही मोठे पाऊल टाकता येतील.

error: Content is protected !!