Ethanol Plant : इथेनॉल उत्पादनासाठी सरकार मदत करणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ethanol Plant : पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होईल. साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखर उत्पादन झाल्यावर काय करावे असा प्रश्न नेहमीच साखर उत्पादकी अधिकाऱ्यांवर असतो. मात्र आता यासाठी इथेनॉलची निर्मिती करणे हा पर्याय बेस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता इथेनॉल उत्पादनासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी सरकार मदत करणार

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्त अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. पुण्यामध्ये ही बैठक पार पडली आहे. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी साखर कारखान्यांच्या इतर प्रश्नसह इथेनॉल निर्मिती बाबत देखील चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर, या बैठकीमध्ये अजित पवार यांनी शिरूर येथील घोडगंगा साखर कारखान्याच्या (Ghodganga Sugar Factory) संपाबाबत कारखाना व्यवस्थापक आणि इतर काही अधिकाऱ्यांकडून याबाबतची अधिकची माहिती घेतली आहे. पुण्यामध्ये ही बैठक पार पडतात अजित पवार हे पवार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जेजुरी कडे रवाना झाले.

इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारही मदत करणार (Ethanol Plant)

दरम्यान, काल अमित शहा देखील पुणे दौऱ्यावर होते. यावेळी बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना केंद्र सरकार मदत करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

Hello Krushi याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून Hello Krushi हे बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी योजना, रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, त्याचबरोबर पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल तीही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!