Ethanol Production : इथेनॉल उद्योगाला 11.20 टक्के मिश्रणाचा पल्ला गाठण्यात यश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा ऊस गाळप हंगाम हा साखर उद्योग आणि इथेनॉल उद्योग (Ethanol Production) दोन्हीसाठीही अडथळ्यांचा राहिला आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसामुळे देशातील ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. मात्र, नंतरच्या काळात त्यास काही प्रमाणात मुभा देण्यात आली. त्यानुसार देशात आतापर्यंत इंधनांमध्ये 11.20 टक्के इतका इथेनॉल मिश्रण करण्याचा पल्ला गाठण्यात इथेनॉल उद्योगाला यश आले आहे.

अद्यापही अधिक कोटा बाकी (Ethanol Production In India)

तेल विपणन कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, 1 नोव्हेंबर 2023 पासून देशात उसाच्या रसापासून आतापर्यंत 76.97 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा इथेनॉल उद्योगाकडून (Ethanol Production) कंपन्यांना करण्यात आला आहे. तर करार मात्र 123.52 कोटी लिटरचा झाला आहे. बी-हेवी उसाच्या रसापासून आतापर्यत ३४.४५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्या आला आहे. तर तेल विपणन कंपन्यांसोबत करार मात्र 73.93 कोटी लिटर झाला आहे. सी-हेवी उसाच्या रसापासून आतापर्यत 1.35 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यातआला आहे. तर तेल विपणन कंपन्यांसोबत करार मात्र 5.35 कोटी लिटर झाला आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे बाकी असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.

उसापासूनच्या निर्धारित लक्ष्यात घट

दरम्यान, यावर्षीच्या गाळप हंगामात उसाच्या रसापासून एकूण 162 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे सुधारित लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला इथेनॉल उद्योगाकडून 270 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, देशातील एकूण ऊस उत्पादनातील घट पाहता, आणि केंद्र सरकारच्या निर्बंधानंतर अलीकडेच इथेनॉल उद्योगातून हंगामातील उसापासून इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य 162 कोटी लिटरपर्यंत घटवण्यात आले आहे.

एकत्रिपणे 121.97 कोटी लिटरचा पुरवठा

याउलट इथेनॉल उद्योगातून धान्यापासूनच्या लक्ष्यात कोणतीही घट करण्यात आलेली नाही. धान्यापासून 292 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यापैकी 45 कोटी लिटरच्या पुरवठा करण्यात उद्योगाला यश मिळाले आहे. अर्थात धान्य आणि उसापासून एकत्रिपणे 121.97 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा तेल विपणन कंपन्यांना करण्यात इथेनॉल उद्योगाला यश मिळाले आहे.

error: Content is protected !!