Ethanol Production : मोठी बातमी..! उसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी, आता इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 38 कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याच्या या निर्णयामुळे बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली 700 कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास (Ethanol Production) देखील मदत होणार आहे.

महासंघाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय (Ethanol Production In India)

देशातील साखर कारखान्यांकडे सध्या 6.7 लाख टन बी हेवी मोलँसिस पडून आहे. देशातील साखरेचे उत्पादन कमी होईल, या भीतीने 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने बी हेवी मोलँसिसपासून इथेनॉल बनविण्यास बंदी घातली होती. तेव्हापासून हा साठा साखर कारखान्यांकडे पडून होता. यापासून इथेनॉल बनविण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पाठविला होता. या प्रस्तावावर विचार केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना थकबाकी मिळण्यास मदत होणार

दरम्यान, केंद्र सरकारने बंदी इथेनॉल निर्मितीस (Ethanol Production) बंदी घातल्याने, साखर कारखान्यांकडे पडून असलेला बी हेवी मोलँसिसचा साठा मोकळा होण्यास मदत होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी चुकती करायची असल्याने, कारखाने देखील आर्थिक संकटातून जात होती. परिणामी, ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे वेळेवर देणेही आता साखर कारखान्यांना शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशभरातील साखर उद्योगाला आणि उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, त्याबद्दल पंतप्रधानांचे तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे मनापासून आभारी आहोत, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या निर्णयाबाबत म्हटले आहे.

error: Content is protected !!