Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी ब्राझीलचा भारताला मदतीचा हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांदरम्यान साखर उत्पादनासंदर्भातील वाद जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) सुरू आहे. मात्र त्यातच आता या वादाचे निराकरण करण्यासाठी ब्राझीलने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) भारताला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतातील अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करता येईल. यासाठी ब्राझीलचा इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाबाबतचा हा प्रस्ताव महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. यामुळे दोन्ही देशातील साखर उत्पादनातील स्पर्धा कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

इथेनॉलमुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होणार – Ethanol Production

ब्राझील ऊस उत्पादनासह इथेनॉल निर्मितीमध्ये जगातील अग्रेसर देश आहे. ब्राझील आपल्या प्रगत इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असून जगातील आघाडीचा साखर निर्यातदार देश देखील आहे. तर भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.ऑटोमोटिव्ह इंधनामध्ये मिश्रित इथेनॉलचे प्रमाण उत्तरोत्तर वाढवण्याची भारताची महत्त्वाकांक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आयातित कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

“ब्राझीलचे हे फ्लेक्स इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) तंत्रज्ञान असून, ते भारतासाठीही महत्वपूर्ण ठरणार आहे. ब्राझीलने WTO मध्ये असा युक्तिवाद केला आहे की, भारत आपली अतिरिक्त ऊस उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वापरू शकतो. त्याद्वारे भारताच्या कच्चा तेलाचा प्रश्न देखील काही अंशी मिटू शकतो. दरम्यान, भारताची अतिरिक्त साखर जागतिक बाजारपेठेत प्रवेश करणार नाही आणि त्याच्या जागतिक बाजारातील साखरेच्या किमतींवर परिणाम होणार नाही. या प्रस्तावाबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!