Ethanol Production : ऊसापासून इथेनॉल निर्मिती कशी होते? वाचा.. काय असते संपूर्ण प्रक्रिया?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक (Ethanol Production) घेतले जाते. ऊस हे बारमाही पीक असते. ज्यामुळे त्यातून होणारा आर्थिक फायदाही अधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्याचा अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र, अनेकांना उसापासून इथेनॉल निर्मिती नेमकी कशी होते? त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होते? इथेनॉल निर्मितीची (Ethanol Production) संपूर्ण प्रोसेस काय असते. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

इथेनॉल उद्योगाचे भविष्य उज्ज्वल (Ethanol Production Process)

उसाच्या रसापासून इथेनॉल बनवले जाते, हे सर्वश्रुत आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना तसेच इथेनॉल उद्योगाला (Ethanol Production) मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देखील देत आहे. या योजनेचा लाभ राज्यासह देशातील साखर कारखान्यांना मिळतो. मात्र, त्याचा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील नेमकी इथेनॉल निर्मिती होते कशी? हे माहिती असणे आवश्यक ठरते. येत्या काळात इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढणार आहे. सध्याच्या घडीला तसा कलही दिसून येत आहे. कच्च्या खनिज तेलाची आयात पाहता सरकार इथेनॉलला प्रोत्साहन देत आहे.

किण्वन पद्धतीचा वापर

इथेनॉलमध्ये सुक्रोज असते. या सुक्रोजचे किण्वन पद्धतीद्वारे इथेनॉलमध्ये रूपांतरण होते. मात्र, त्याआधी त्यास अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. यात सर्वप्रथम उसाचे गाळप करून, त्यातून रस बाहेर काढला जातो. हा काढलेला रस किण्वन टाकीत साठवला जातो. या टाकीत यीस्टच्या साहाय्याने उसाचा रस आंबवून इथेनॉल तयार होते. त्यानंतर हे इथेनॉल इंधन म्हणून वापरले जाते.

शेवटी डिस्टिलेशन प्रक्रिया

उसाचे गाळप केल्यानंतर उरलेल्या पाचटाला ‘बगॅसे’ म्हणतात. ही बगॅसे जाळून उष्णता निर्माण होते. ज्याची उर्जा इथेनॉल बनविण्याचे यंत्र चालवते. या बगॅसला सामान्य भाषेत बगॅसे म्हणतात. ही ऊर्जा कारखान्यातील बॉयलर, उष्णता किंवा वाफेवर किंवा वीजनिर्मितीमध्ये वापरली जाते. शेवटी इथेनॉल तयार झाल्यानंतर, ते डिस्टिलेशनसाठी पाठवले जाते. या प्रक्रियेतून ‘निर्जल इथेनॉल’ खनिज तेल कंपन्यांना वापरासाठी तयार होते. या प्रक्रियेतून बगॅसे हा घनकचरा आहे, तर विनासे हा द्रव कचरा तयार होतो.

error: Content is protected !!