Ethanol Production : राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट; यंदा केवळ 37 कोटी लिटर उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशात इथेनॉल उद्योग (Ethanol Production) चांगलाच बहरला आहे. इथेनॉल उद्योगामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उसाला योग्य दर मिळण्यास मोठा फायदा झाला आहे. अशातच आता चालू ऊस गाळप हंगामात राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास बंदी घातल्याने, राज्यातील साखर उत्पादनात वाढ नोंदवली गेली.

केवळ एक तृतीयांश उत्पादन (Ethanol Production In India)

अधिकृत आकडेवारीनुसार, 2023-24 च्या चालू गाळप हंगामात राज्यात आतापर्यंत 37 कोटी लिटर इतके इथेनॉल उत्पादन (Ethanol Production) नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षीच्या 2022-23 च्या हंगामात 103 कोटी लीटर इतके नोंदवले गेले होते. परिणामी, यंदाच्या गाळप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत 66 कोटी लिटर इतकी इथेनॉल निर्मिती कमी नोंदवली गेली आहे. अर्थात यंदा राज्याला केवळ एक तृतीयांश इथेनॉलचे उत्पादन करण्यात यश मिळाले आहे.

315 कोटी लीटर उत्पादनाची क्षमता

महाराष्ट्र हे ऊस उत्पादनातील आघाडीवरील राज्य असून, राज्यात इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करणारे एकूण 136 प्रकल्प आहेत. यामध्ये राज्यात 46 सहकारी साखर कारखान्यांनी तर 50 खासगी साखर कारखान्यांनी आपले इथेनॉलचे प्रकल्प उभारले आहेत. तर उर्वरित 40 प्रकल्प स्वतंत्ररित्या उभारण्यात आले आहे. राज्यातील या सर्व 136 प्रकल्पांमध्ये 315 कोटी लीटर इतकी विक्रमी इथेनॉल निर्मिती करण्याची क्षमता आहे. केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला. ज्यामुळे राज्यातील ऊस साखर निर्मितीकडे वळता झाला.

ऊस पिकाला कमी पावसाचा फटका

मात्र, यंदा एल-निनोमुळे ऊस उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी अगदी जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र, पुन्हा एक महिना पावसाचा खंड पडला. ज्यामुळे ऐन वाढीच्या अवस्थेत उसाला फटका. त्यानतंर सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगली साथ दिली. मात्र, ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनचा पाऊस माघारी फिरला. धरणे मात्र रिकामीच ठेवून गेला. परिणामी, यंदा संपूर्ण हंगामात ऊस पिकाला शेतकऱ्यांना मोठ्या मुश्किलीने पाणी पुरवावे लागले.

error: Content is protected !!