Export Import License : शेतमाल निर्यातदार व्हा! पहा… व्यवसायासाठी कोणती कागदपत्रे लागतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतकऱ्यांना ‘माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही’ (Export Import License) हे वारंवार ऐकायला मिळते. परिणामी आता शेतकऱ्यांच्या पोरांनी फळे व भाजीपाला यांसारख्या शेतमालाच्या आयात-निर्यात व्यापारात उतरणे गरजेचे झाले आहे. मात्र, त्यासाठीची माहिती नसल्याने अनेकांना ही वाट धरणे कधी जमत नाही. मात्र आज आपण शेतमाल आयात-निर्यात व्यापार (Export Import License) सुरु करण्यासाठी काय करावे लागते? कोणती कागदपत्रे लागतात? त्यासाठी अर्ज कुठे करायचा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम कंपनीची स्थापना (Export Import License Agri Exporter)

महाराष्ट्र सरकारच्या पणन महामंडळाच्या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळून जाईल. तुम्हाला जर शेतमाल आयात-निर्यात व्यापारात उतरायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हांला तुमची कंपनी स्थापन करावी लागेल. यामध्ये तुम्हाला एखाद्या प्रोप्रायटरी / भागीदारी /प्राईव्हेट लिमिटेड / पब्लिक लिमिटेड / सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी अथवा ट्रस्ट इ. प्रकारच्या संस्थेशी संबंधित विभागांकडे नोंदणी करावी लागेल. तुम्हाला एकट्याला देखील कंपनी सुरु करता येते. यासाठी तुम्हाला उद्यम आधार यावर रजिस्ट्रेशन करावे लागते. (https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm) याशिवाय वैयिक्तक पातळीवर Shop Act License काढावे लागते.

असा काढा आयात-निर्यात परवाना

त्यानंतर आयात – निर्यात परवाना (IEC) परवाना (Export Import License) मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यासाठी खालील लिंक नुसार दिलेल्या सुचनांनुसार अर्जदाराने अर्ज करावा. (संकेतस्थळ – www.dgft.gov.in). आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यावर तुम्हाला निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी (RCMC) नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र आवश्यक असते. कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी एपीडा, नवी दिल्ली यांचे वेबसाईटच्या (www.apeda.gov.in) द्वारे ऑनलाईन अर्जाद्वारे त्यासाठी नोंदणी करता येते.

व्यवसायाचा प्रकार कोणता?

दरम्यान, त्यानंतर तुम्ही आयात-निर्यात व्यवसाय हा वैयक्तिक पातळीवर करता की भागीदारीमध्ये याचेही काही नियम असतात. मग त्यात सामान्य भागीदारी (दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती) हा व्यवसाय Indian Partnership Act, 1932 द्वारे नियंत्रित केला जातो. मर्यादित दायित्व भागीदारी (कमीत कमी २ सदस्य किंवा भागीदार) हा व्यवसाय Limited Liability Partnership Act, 2008 नुसार नियंत्रित केला जातो. वरील दोन प्रकारचे व्यवसाय तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकतात. त्यानंतर वैयक्तिक व्यवसायासाठी खाजगी लिमिटेड कंपनी हा पर्याय असतो. या प्रकारच्या व्यवसायाची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार केली जाते.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • कंपनीचे पॅन कार्ड (कंपनीच्या प्रकाराप्रमाणे पॅन कार्ड काढणे बंधनकारक आहे)
  • आयात-निर्यात परवाना ( वरती दिल्याप्रमाणे परवान्यासाठी www.dgft.gov.in वर नोंदणी करावी. आयात आणि निर्यात हे दोन वेगवेगळे परवाने असतात. निर्यातीसाठी निर्यात परवाना तर आयातीसाठी आयात परवाना लागतो)

आयात-निर्यात कोडसाठीची कागदपत्रे

  • अर्जदार, फर्म किंवा कंपनीच्या पॅन कार्डची प्रत
  • अर्जदाराची मतदार ओळखपत्र, आधार किंवा पासपोर्टची प्रत
  • अर्जदार, कंपनी किंवा फर्मच्या चालू बँक खात्याचा चेक रद्द केलेला
  • ऑफिस कॅम्पसच्या वीज बिलाची किंवा भाडे कराराची प्रत

महत्त्वाच्या गोष्टी

  • आयात-निर्यात व्यवसायासाठी (Export Import License) वस्तू आणि सेवा कर निर्यात व्यवसायाला GST नंबर अनिवार्य आहे.
  • RCMC- RCMC रेजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. (ज्यांना निर्यात व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी हे एक अनिवार्य सर्टिफिकेट आहे.) हे सर्टिफिकेट एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल देते. तर फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी अपेडा ही संस्था RCMC सर्टिफिकेट जारी करते.
  • FSSAI लायसन्स हे फळे आणि भाज्या निर्यात करण्यासाठी बंधनकारक आहे. हे लायसन्स Food Safety And Standard Authority of India जारी करते.
  • Port Registration – भारतातून निर्यात आणि आयात करण्यासाठी पोर्ट रेजिस्ट्रेशन हे आवश्यक आहे. ICE GATE या पोर्टलवर जाऊन वर दिलेली सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचे पोर्ट रेजिस्ट्रेशन होते. पोर्ट रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही भारतातून फळे आणि भाज्या निर्यात आणि आयात करू शकता. ही सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या साहाय्याने तुम्हाला तुमचा आयात-निर्यात व्यवसाय चालू करता येतो.
error: Content is protected !!