Farm Produce Sale : शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टवर – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन (Farm Produce Sale) बाजारातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत राज्य सरकारकडून करार करण्यात आला आहे. या करारामुळे शेतकरी आपला शेतमाल थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा (Farm Produce Sale) होणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ), मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी (Farm Produce Sale) भागीदारी बैठक -2024 सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणार (Farm Produce Sale Online Platform)

राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा प्रारंभ केला आहे. अनुदानातून, नुकसानभरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 2014-19 या काळात शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी करण्यात आली. वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

शेतकऱ्यांची उत्पादने ऑनलाईन

आता पुढचा टप्पा प्रारंभ झाला असून, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे आहे. त्यासाठीच ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व ओएनडीसी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. शेतकऱ्यांची उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या भागीदारी बैठकीत पंधराहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले.

error: Content is protected !!