हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

सेंद्रीय शेतीतून ‘हा’ शेतकरी कमवत आहे वार्षिक 17 लाख रुपये; विशेष योगदानासाठी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतक-यांना सेंद्रिय शेती करण्यास उद्युक्त करत आहे. हे पर्यावरणास अनुकूल आहे आणि मातीच्या सुपिकतेवरही वाईट परिणाम होत नाही. अलिकडच्या वर्षांत सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याची किंमतही चांगली आहे. अशा परिस्थितीत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असून त्यांची कमाई वाढत आहे. मेघालयातील एक शेतकरी सेंद्रिय शेतीतून 17 लाख रुपये कमाई करीत आहेत. ते शेतकर्‍यांसाठी प्रेरणास्रोतही बनले आहेत. सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान पाहून सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

मेघालयातील रहिवासी नानादारो बी. मारक सेंद्रिय पद्धतीने काळी मिरीची लागवड करतात. त्यांचे घर पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील त्रितीकिला ब्लॉकच्या डोंगरावर आहे. त्यांच्या घराभोवती वारा आल्यास मिरिचा सुगंध येतो. 1980 च्या दशकात नानदारो बी. मारक यांना सासऱ्यांकडून 5 एकर शेत जमीन मिळाली. आज या शेतात साडेतीन हजार मिरीची झाडे आहेत. 61 वर्षीय नानादाराओ बी. मारक यांनी प्रथम किरमुंडा जातीची काळी मिरीची लागवड केली. ती मध्यम आकाराची असते. ते म्हणतात की सुरुवातीला मी 10 हजार रुपये खर्च करून शेती करण्यास सुरुवात केली. प्रथमच शेतात 100 झाडे लावली. काळानुसार झाडांची संख्या वाढत गेली.

आसपासच्या शेतक्यांनी जास्त उत्पादनासाठी रासायनिक खताचा वापर केला. या सर्वांच्या उलट नानादारो बी. मारक यांनी खत टाळले आणि पर्यावरणाला अनुकूल जैविक मार्गाने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला संसाधनांच्या अभावामुळे काही अडचणींनाही सामोरे जावे लागले. परंतु, मारक यांनी कधीही हार मानली नाही आणि ते पुढे सरसावले. राज्याच्या कृषी व फलोत्पादन विभागाच्या मदतीने आणि अथक प्रयत्नांनी मादक यांनी त्यांच्या कृत्याने काळी मिरीच्या सेंद्रिय लागवडीला नवीन आयाम दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळी मिरी तसेच इतर मसाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. ते सर्व पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या बळकट झाले आहेत. रासायनिक खतांचा वापर न केल्याने नैसर्गिकरित्या समृद्ध मेघालयाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासही मदत झाली आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

error: Content is protected !!