Farmer Mobile Tower : पीक विम्याची रक्कम मिळेना, शेतकरी थेट मोबाईल टॉवरवर चढला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातच नाही सध्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी (Farmer Mobile Tower) एक ना अनेक प्रकारे अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राजस्थान येथील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, तेथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा नोंदणीत सरकारी अधिकारी आणि विमा कंपन्यांनी अफरातफर केल्याने, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाहीये. त्यामुळे मंगळवारी (ता.१९) राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भणियाना तालुक्यातील एक शेतकरी चक्क मोबाईलच्या टॉवरवर (Farmer Mobile Tower) चढल्याचे समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? (Farmer Mobile Tower Due To Pik Vima Amount)

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात सध्या शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. विमा कंपन्यांसोबत साटंलोटं करत सरकारी अधिकाऱ्यांनी पीक नुकसानीची चुकीची माहिती सरकार दरबारी सादर केली. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची चुकीची माहिती सादर केल्याने काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीये. तर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. 29 जानेवारी २०२४ रोजी जैसलमेर जिल्ह्यात भणियाणा तालुक्यातील पीक नुकसानीबाबत शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते.

नव्याने पीक नोंदणीची मागणी

मात्र, त्यानंतर आता जिल्ह्यांमध्ये अन्य तालुक्यात शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा दिला जात आहे. याउलट भणियाणा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी हे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनावेळी संतापलेला एक शेतकरी थेट मोबाईल टॉवर (Farmer Mobile Tower) चढला. त्याने स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे तालुक्यात पीक नुकसानीची नव्याने नोंदणी करत, भरपाई देण्याची मागणी केली आहे. किशन सारण असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने 2023 मध्ये भणियाणा तालुक्यात दुष्काळ घोषित केलेला असताना, देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळत नसल्याचे म्हटले आहे.

प्रांत अधिकाऱ्यांचे आश्वासन

दरम्यान, शेतकरी आदोंलन करत असताना प्रशासनातील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी किशन सारण हा शेतकरी मोबाईल टॉवरवर चढल्याने, भणियाणा तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रभोजोत गिल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकरी किशन सारण यास महिनाभरात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जीयो टॅगिंग करत, पुन्हा पीक नोंदणी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर हा शेतकरी टॉवरवरून खाली उतरला असून, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी देखील आपले आंदोलन मागे घेतले आहे.

error: Content is protected !!