Farmer Success Story: गांडूळ खत निर्मितीतून समृद्ध शेतीचा मार्ग शोधणारी महिला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात एका शेतकर्‍यांच्या (Farmer Success Story) कुटुंबात जन्मलेल्या आणि शेतकरी कुटुंबातच लग्न झालेल्या सुवर्णा भगवान पाटील या पारंपरिक शेतीत समाधानी नव्हत्या. 2.5 एकर जमिनीतून चार जणांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना उत्पन्नात विविधता आणण्याचा मार्ग शोधायचा होता (Farmer Success Story).

ऊस या दीर्घ कालावधीच्या एका पिकाच्या उत्पन्नावर सुवर्णा सारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कुटुंब चालवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. त्यातच हवामानातील अनियमितता यामुळे परिस्थिती अजूनही बिकट होत होती.

याच कालावधीत सुवर्णा या ‘उन्नती मीठा सोना अंतर्गत आयोजित माती आरोग्य सुधारणेच्या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. या प्रशिक्षणातच त्रेचाळीस वर्षीय सुवर्णाला एक आशेचा किरण दिसला, तो म्हणजे गांडूळ खत निर्मिती (Vermi Compost).

अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेने, त्यांनी गावातील शेतकरी फील्ड स्कूलला भेट दिली जिथे त्यांना गांडूळखत निर्मिती आणि त्याचे फायदे तसेच पुनरुत्पादक कृषी पद्धती याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती मिळाली.

सुवर्णाला जाणवले की त्या त्यांच्या उसाच्या शेतात जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत आहे. त्याऐवजी गांडूळखत, हा एक जैविक, पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर पर्याय आहे. 2022 मध्ये सुवर्णा यांनी गांडूळखत प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबतच एक प्रगतीशील शेतकरी-उद्योजिका बनण्याच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली (Farmer Success Story).

त्यांना वाटते जमिनीचे आरोग्य हे माणसाच्या आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात, त्यांच्या लक्षात आले की गांडूळ खत वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि गांडुळ आणि कंपोस्ट विकून पैसेही कमवता येतात. याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्वत:चे गांडूळखत यूनिट उभारण्याचे ठरविले.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत, सुवर्णाला त्यांच्या शेतात गांडुळ खत यूनिट उभारण्यासाठी गांडूळ-बेड सोबतच तज्ज्ञ प्रशिक्षक आणि कर्मचार्‍यांकडून मार्गदर्शन मिळाले. फील्ड टीम नियमितपणे त्यांच्या शेताला भेट देत कंपोस्टचे निरीक्षण करत असे आणि त्यांना बेडच्या देखभालीबद्दल सल्ला देखील देत असे.

पाच महिन्यांत सुवर्णाला बदल दिसला. गांडूळ खताच्या एका बेडमधून 450 किलो गांडूळ खत मिळाले ते त्यांनी उसाच्या शेतात तसेच घरातल्या भाजीपाला आणि इतर पिकांसाठी वापरला.  

एक वर्षाच्या आत सुवर्णा यांनी दोन गांडूळ बेडमधून 3,200 किलोपेक्षा जास्त गांडूळ खत तयार केले. अतिरिक्त गांडूळ खत तिच्या गावातील इतर शेतकऱ्यांना विकले आणि 20,000 रुपये कमावले. हे त्यांना ऊस पिकातून मिळणाऱ्या उत्पन्ना व्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न होते. स्थानिक दूध संकलन केंद्रावर त्या म्हशीचे दूध सुद्धा विकतात, तसेच म्हशीपासून मिळणारे  5,000 किलो शेण गांडुळ खत तयार करण्यासाठी वापरतात.

गांडूळ खताचा नियमित वापर केल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला यामुळे हंगामात 8,500 रूपयांची बचत सुद्धा झाली आहे.

“गांडूळ खतामुळे मला पैसे वाचवायला मदत झाली, मी आता मा‍झ्या पि‍काला गांडूळ खतासह फक्त शिफारस केलेले रासायनिक खतांचा डोस देते असे त्या अभिमानाने सांगतात.

भविष्यात गांडूळ खत विक्रीतून व्यवसाय वाढवण्याची त्यांची योजना आहे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या आपल्या मुलाला आधार देण्यासाठी त्यांच्या बचतीचा काही भाग वापरतात.

सुवर्णा या इतर शेतकरी महिलांसाठी एक प्रेरणा आहेत (Farmer Success Story). त्याचे अनुभव सुद्धा ते इतरां सोबत  शेअर करतात. त्यांच्या गावातील इतर महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात गांडूळ बांधण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यामुळे  इतर महिलांना सुद्धा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल आणि पृथ्वी मातेचे रक्षणही करता येईल, असे त्या म्हणतात (Farmer Success Story).

error: Content is protected !!