Farmer Success Story: सेंद्रिय शेतीद्वारा विविध पिकातून 2 लाखाच्या वर नफा कमावणारा शेतकरी  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील (Farmer Success Story) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेतकरी  आदिनाथ अण्णाप्पा किणीकर यांनी सेंद्रिय पद्धतीने मुख्य पिके, फळपिके आणि भाजीपाला पिकातून 2 लाखाच्या वर उत्पन्न कमवले आहे (Farmer Success Story).

यासाठी त्यांनी नैसर्गिक शेती, बहु-पीक पद्धती, गांडूळ खत निर्मिती या सेंद्रिय पद्धती तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे.

आदिनाथ अण्णाप्पा किणीकर (Farmer Success Story) यांनी त्यांच्या 6 एकर जमिनीवर गांडूळ खत, वर्मीवॉश जीवामृत, दशपर्णी अर्क, गिर-गोकृपा अमृतम आणि फेरोमोन सापळे स्थानिक पातळीवर तयार करून पिकांसाठी वापरले. तसेच कृषी निविष्ठा तयार करण्यासाठी गीरसारख्या देशी गायी सुद्धा ते  पाळतात.

त्यांच्या शेतात ऊस (2 एकर), सोयाबीन (½ एकर), आंतरपीक म्हणून मूग (1 एकर), भात (¼ एकर), हरभरा (¼ एकर), भुईमूग (½ एकर) आणि ज्वारी (½ एकर) अशी अनेक पिके लावली गेली.

तसेच, फळ पिके आणि झाडे चिकू, लिंबू, आंबा, केळी, नारळ, पपई, सीताफळ सफरचंद, पेरू आणि शेवगा यासारखी फळपिके आणि झाडे सुद्धा लावली. भाजीपाला पिकांमध्ये वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आणि कोथिंबीर ही पिके त्यांच्या शेतात घेतली जातात.

या सर्व पिकांची योग्य प्रकारे लागवड आणि व्यवस्थापनातून त्यांना 2,36,500 रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.  मिळाले.

आंबा, पेरू, सीताफळ, सफरचंद, केळी, चिकू आणि पपईच्या झाडांपासून 2,73,000 रुपये आणि वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आणि कोथिंबीरपासून 73,000 रुपये निव्वळ नफा त्यांना मिळत आहे.  

एवढेच नाही तर गायींच्या संगोपनातून आणि गांडूळ खताच्या विक्रीतून सुद्धा 1,08,000 रूपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

किणीकर यांची यशोगाथा (Farmer Success Story) इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत आणि योग्य व्यवस्थापनातून शेतीतून नफा कमवता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

error: Content is protected !!