Farmer Success Story: पहिली पास शेतकऱ्याने मेहनतीने केली शेती यशस्वी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील शेतकरी (Farmer Success Story) मेहनतीत कधीच मागे पडत नाही. त्यांच्या प्रयत्नाने ते शेतात नंदनवन सुद्धा फुलवू शकतात. आज अशाच एका शेतकर्‍याबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी स्वत:च्या मेहनतीने पारंपरिक पिकांसोबतच आधुनिक पिके घेतली. एवढेच नाहीतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुद्धा सुरु केले.  

नाशिक जिल्ह्यातील( Nashik District) सुरगाणा तालुक्यातील दुर्गापूर गावातील अर्जुन हाडस (Arjun Hadas) असे या शेतकऱ्याचे नाव आहे (Farmer Success Story).

अर्जुन हाडस हे मूळचे दुर्गापूरचे. या गाव शिवारात त्यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. सुरवातीला पासूनच पारंपरिक शेती करत आले. अर्जुन हाडस यांचं शिक्षण अवघ पहिलीच्या वर्गात झालेले. मात्र घरची शेती असल्याने ते पहिल्यापासून शेतीत रमले. एकादशीला पंढरपूरला जायचो मग शेती पाहायचे, मग आपल्याला शेतीत काही बदल करता येतील का? म्हणून पारंपरिक शेतीला सोबत आधुनिक शेतीला सुरवात केली. पुढे 2012 मध्ये त्यांनी बँकेतून कर्ज काढले. त्या कर्ज आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. हळूहळू टोमॅटो, कांदा, भाजीपाला मग आता आता स्ट्रॉबेरी लागवड करत शेतीत बदल केला. मात्र हे सगळं करत असताना दुसरीकडे कुटुंब चालवत कर्जाचा डोंगर सुद्धा कमी करत आहेत.

आजच्या घडीला शेतकरी हाडस हे स्ट्रॉबेरी पिकासह गहू, टोमॅटो, बटाटे आदी पिके घेत आहेत, पूर्वी ते भात, नागली, वरई अशी पारंपरिक पिके घेत असतं. मात्र आता कमालीचा बदल झाला आहे.

शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरव (Shetinishtha  Puraskar)

सद्यस्थितीत हाडस यांनी शेतीसोबतच पोल्ट्री फार्मही सुरु केले आहे. या फार्ममध्ये साडे चार हजार पक्षी असून शेतीसोबत जोडधंदा (Farmer Success Story) म्हणून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. हाडस यांनी पाच एकर शेतीसाठी  शेतातच शेततळे उभारले आहे. तर शेतीसाठी बोअरसुद्धा खोदलेली आहे. जेव्हा लाईट नसते तेव्हा ते शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावर शेती करतात. शिवाय शेततळ्यामध्ये ते मत्सपलणाचा व्यवसायही करतात. जोड धंद्यातून चांगला नफा मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी जोड धंदा उभारावा असही ते आग्रहाने सांगता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2019 मध्ये आदिवासी गटातील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून त्यांची यशोगाथा (Shetkari Yashogatha) देखील प्रसिद्ध करण्यात आली

‘शेती फुलवली, प्रगती झाली, मात्र अजूनही बँकेचे कर्ज फेडण्यात आयुष्य चाललंय. शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाने हातभार लावून शेतकऱ्यांकडील ओझं हलकं करावं, म्हणजे शेतकऱ्यांना देखील समाधान वाटेल, शेतकऱ्यांची चांगली बाजू दाखवितांना त्या शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागलेत, आता किती कष्ट घेतोय याचा सारासार विचार करून शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही’, असे अर्जुन हाडस (Farmer Success Story) यांना वाटते.

error: Content is protected !!