Farmer Success Story: सोलापूरच्या शेतकर्‍याची कमाल! शेतात पिकवली निळ्या रंगाची केळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात केळी (farmer Success Story) उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागतो हे आपल्याला माहीतच आहे. महाराष्ट्रात जळगाव हा केळ्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या जातीच्या केळींचे उत्पादन (Banana Farming) घेतले जाते. परंतु निळ्या रंगाची केळी (Blue Banana) तुम्ही कधी बघितली आहेत का?

सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यांच्या (farmer Success Story) निळ्या रंगाच्या केळी उत्पादित केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या शेतकऱ्याची आणि त्याने पिकवलेल्या निळ्या केळीचीच चर्चा आहे.

सोलापूर जिल्हात, करमाळा तालुक्यात वाशिंबे गावातील या शेतकऱ्याचे नाव (farmer Success Story) आहे अभिजित पाटील.

अभिजीत यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातून ‘ब्लू जावा’ (Blue Java Banana) या निळ्या केळीचे वाण आणले. दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी या केळीचे उत्पन्न घेतले आहे. दोन एकरातुन त्यांना 50 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे निळ्या केळीचे वैशिष्ट्ये (Blue Java Banana)

‘ब्लू जावा’ या वाणाचे अमेरिका, व्हिएतनाम, फिलिपाइन्स या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या केळीचा गर मलईसारखा असून चव व्हॅनिला आईस्क्रीमसारखी आहे. या केळीपासून वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, स्वादिष्ट असे अनेक पदार्थ बनवू शकता.

निळ्या केळीचे बाजार भाव (Banana Market Rate)

भारतीय चलनानुसार या केळीचे दर ( Banana Rate) अमेरिकेमध्ये 900 रुपये प्रति किलो एवढे आहे. सध्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट या ठिकाणी या केळींना 90 रुपये किलो या दराने बाजार भाव मिळतोय. पुढे या केळीला बाजारात 100 ते 150 रुपयांचा भाव मिळू शकतो. विशेष म्हणजे आत्तापासूनच व्यापाऱ्यांकडून आणि मॉलमधून या केळीची मागणी होत आहे.

ग्राहक नेहमी नवीन काहीतरी शोधत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणीनुसार पुरवठा केल्यास त्यांना निश्चितच चांगले उत्पादन मिळू शकते हे अभिजित यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे.

error: Content is protected !!