Farmer Success Story: लखीमपुर येथील शेतकर्‍याने ‘ग्लॅडिओलस’ फुल लागवडीतून निर्माण केली प्रदेशाची नवी ओळख!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी (Farmer Success Story) हा मध्यवर्ती प्रदेश जिथे एकेकाळी उसाचे क्षेत्र (Sugarcane Belt) म्हणून ओळखले जात होते. तिथे आता स्थानिक शेतकरी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NBRI) यांच्या एकत्रित सहयोगी प्रयत्नांमुळे, हा भाग आता ग्लॅडिओलस (Gladiolus) या विदेशी आणि झेंडू (Marigold) या  देशी फुलांनी बहरला आहे.  

विदेशी फूल (Exotic Flower) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ग्लॅडिओलसच्या फुलशेतीमुळे (Flower Farming) या भागात केवळ आर्थिक समृद्धीच आली नाही तर या प्रदेशातील शेती करण्याच्या पद्धतींमध्ये विविधता आल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये (Farmer Success Story) नवीन उत्साह सुद्धा निर्माण झाला आहे.

असाच एक प्रगतीशील शेतकरी म्हणजे मडई पूर्वा ब्लॉकमधील अचल कुमार मिश्रा.

लखीमपुर भागात विदेशी फुलपीक लागवडीच्या क्रांतीतील अग्रेसर शेतकरी (Farmer Success Story) म्हणून अचल कुमार यांचे नाव घेतले जाते.   

अचल कुमार यांना CSIR-NBRI च्या फ्लोरिकल्चर मिशनच्या पाठिंब्याने तसेच शास्त्रज्ञांचे तज्ज्ञ  मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यांच्या मार्फत ग्लॅडिओलसचे 60,000 कंद मोफत मिळाले. याशिवाय, त्यांना 40,000 झेंडूची रोपे सुद्धा देण्यात आली. अचल कुमार यांनी एक एकर जमिनीवर ग्लॅडिओलसची लागवड केली आणि अतिरिक्त दोन एकरांवर उसामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतले.

ग्लॅडिओलसच्या फुलामुळे मिश्रा यांच्या शेताला सुंदर देखावा लाभला आहे. डोळ्यांना भुरळ घालणार्‍यां वेगवेगळ्या रंगाच्या असंख्य ग्लॅडिओलस फुलामुळे त्यांची शेती सध्या बहरली आहे.

मिश्रा हे प्रति एकर 80 ते 90 हजार ग्लॅडिओलस स्टिकचे उत्पादन घेत असून यातून त्यांनी चांगलीच आर्थिक प्रगती साधली आहे. एवढेच नाही तर ग्लॅडिओलस फुलांसाठी भारताबाहेर सुद्धा त्यांनी आपली बाजारपेठ (Flower Market) निर्माण केली आहे. शेजारच्या नेपाळमध्ये त्यांच्या या फुलांना प्रचंड मागणी आहे.

अचल मिश्रा यांनी ऊस लागवडीत सुद्धा नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (Farmer Success Story) त्यांना गौरवण्यात आले आहे.

लखीमपुर भागात झालेल्या या पुष्पक्रांतीचा प्रभाव आर्थिक फायद्यांच्या पलीकडे आहे असे अचल मिश्रा यांना वाटते. या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना जास्त मागणी आहे. जवळील प्राचीन मंदिरे आणि होळीच्या उत्सवासाठी ही फुले आता अविभाज्य घटक बनलेली आहेत. त्यामुळे या प्रदेशातील फुलशेतीचे सांस्कृतिक महत्त्व फक्त वाढले नाही तर आणखी मजबूत झाले आहे असे ते म्हणतात.

error: Content is protected !!