Farmer Success Story: टोमॅटोसह झेंडू विक्रीतून शेतकरी तीन महिन्यांत झाला कोट्याधीश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मेहनतीने उत्पादन केलेल्या शेतमालाला (Farmer Success Story) बरेचदा योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त होतो आणि आपल्या शेतमालाला फेकून देतो किंवा नष्ट करतो. परंतु काही वेळा शेतकर्‍यांना मागणीनुसार योग्य  भाव मिळाला की हाच शेतकरी कोट्याधीश सुद्धा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशा शेतकर्‍याबद्दल ज्याने टोमॅटो विक्रीतून कोटी रुपये (Farmer Success Story) कमावले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावात गोपाळ लक्ष्मण गवारे आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर टोमॅटोची लागवड करतात. गवारे कुटुंब हे 1994 सालापासुन टोमॅटोची लागवड करतंय. त्यापूर्वी गवारे कुटुंब शेतात उसाची लागवड करत होते. मात्र 1994 ते 97 साली  त्यांनी शेतात टोमॅटो आणि झेंडूचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सुरवातीला त्यांनी 2 ते 3 एकरातच टोमॅटोचे पीक घेतले. यात त्यांना चांगला भावदेखील मिळाला होता. त्यानंतर मंदी आल्यानं त्यांनी टोमॅटोचं पीक घेणे कमी केलं. त्यानंतर 2006 पासून 10 एकर जमिनीची मशागत करून त्यांनी पुन्हा टोमॅटो लावायला सुरवात केली. यानंतर त्यांनी आतापर्यंत 20 एकर शेतात टोमॅटोची लागवड केलीयं. तर इतर ठिकाणी झेंडूच्या फुलांची लागवड केलीयं. त्यातच त्यांना मागच्या वर्षी टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळाल्याने मोठा फायदा झाला.

गेल्या 20 वर्षांपासून गवारे कुटुंब फुलांची शेती करतयं. (Marigold flower) गवारे कुटुंबीयांकडून सणाच्या काळात शेतीत झेंडूच्या फुलांची शेती केली जाते. मागच्या वर्षी सात एकरात त्यांनी 36 हजार झेंडूच्या फुलाचे रोपं लावली होती. बाजारात झेंडूंच्या फुलांना चाळीस रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. सात एकर मध्ये लावलेल्या झेंडूच्या फुलाचे 35 टन पेक्षा जास्त माल झाला. यातून देखील दहा लाखाच्या वर उत्पन्न मिळाले. टोमेटोसह झेंडूमधून त्यांना तीन महिन्यात सुमारे 1 कोटी 20 लाखांचे उत्पन्न मिळाले.

बाजारभाव आणि मार्केट यांचा योग्य अभ्यास केल्यास कोणतेही पीक नफ्यात आणता येते हे गवारे कुटुंबाच्या यशातून इतर शेतकऱ्यांनी शिकायला हवे (Farmer Success Story).

error: Content is protected !!