Farmer Success Story: मिश्र भाजीपाला लागवडीतून आर्थिक प्रगती साधणारा शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बहुतेक शेतकरी (Farmer Success Story) एकाच पि‍कावर अवलंबून असण्यापेक्षा वेगवेगळी पिके घेण्यावर भर देत आहेत. कारण यामुळे पीक नुकसानीचे प्रमाण तर कमी होतेच शिवाय चांगला बाजारभाव सुद्धा मिळवता येतो.  अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी जे विकते तेच पिकवायचे याला आपला मूलमंत्र मानून एकच पीक न घेता त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेत आहेत. या शेतकर्‍याचे नाव आहे विठ्ठल गणेशराव काकडे (Farmer Success Story).

परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील या प्रयोगशील शेतकर्‍याने पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) करून आर्थिक उन्नती साधली आहे. भाजीपाला शेतीतून त्यांनी आतापर्यंत लाखोचं उत्पन्न मिळवले आहे.  

विठ्ठल काकडे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत (Solar Pump) ऑनलाईन अर्ज केला. या योजनेच्या माध्यमातून त्यांना सौर कृषी पंप मिळाला आणि यामुळे शाश्वत सिंचन सुविधेचा विठ्ठल काकडे यांना लाभ मिळाला (Farmer Success Story). याचा फायदा घेत त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, कोबी, कांदा, लसुण अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. यातून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्याचा आणि रासायनिक खताचा कमी वापर कसा करता येईल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.

भाजीपाला पिकांमध्ये मिश्र दुहेरी पीक (Mixed Cropping)

विठ्ठल काकडे यांनी भाजीपाला लागवडीतून आतापर्यंत कारले पि‍कातून एक लाख 12 हजार रुपये, दोडके पि‍कातून दीड लाख, तर टोमॅटो पि‍कातून दीड लाख खर्च वगळता अडीच लाख रूपयांचे निव्वळ नफा झाले असल्याचे सांगतात. सध्या त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारले लागवड केली असून, वांग्यामध्ये कोबी, तर कांद्यामध्ये मिरचीचे मिश्र दुहेरी पीक घेतले आहे. यावर्षी एकरी 200 कट्टा कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून, खेडोपाडी जाऊन ते स्वत:च कांदे विक्री करतात. याप्रकारे कांदा विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे (Farmer Success Story) काकडे सांगतात.

पारंपरिक शेतीला वेगवेगळ्या प्रयोगाची साथ

पूर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी काकडे यांची ओळख असून, ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देत कृषिविषयक विविध कार्य शाळांमध्ये सहभागी होतात. कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे त्यांना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. पारंपारिक शेतीला जोडधंदा व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शेतकर्‍यांनी आपल्या कृषी उत्पन्नात वाढ करावी. मागील अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग आणि भाजीपाला शेती यातून नफा मिळवून शेतकर्‍यांनी आधुनिक शेती करावी. तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब करावा, असे विठ्ठल काकडे इतर शेतकर्‍यांना सांगतात.  शेतकर्‍यांनी पीक पद्धतीत बदल करून शेती केल्यास त्यांना फायदा तर होतोच शिवाय त्यांचे उत्पन्न वाढवण्यास शासनाकडून प्रोत्साहन सुद्धा दिले जाते. शेतकर्‍यांना स्वत:ची प्रगती साधायची असल्यास नवनवीन कृषी तंत्रांचा व यांत्रिकीकरणाचा वापर करणे गरजेचे झाले आहे, हेच या यशोगाथेतून (Farmer Success Story)शिकायला मिळते.

error: Content is protected !!