Farmer Success Story: पीक वैविध्यतेचा अवलंब करून, नफ्यात शेती करणारी यशस्वी महिला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपण नेहमी म्हणतो की शेतकर्‍यांनी (Farmer Success Story) एकच पीक घेण्यापेक्षा वेगवेगळी पिके (Multi Cropping) घ्यावीत. परंतु फार कमी शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामागे वेगवेगळी कारणे असतीलही परंतु शेतीला जर फायद्यात आणायचे असेल तर एका पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पिकात विविधता ठेवायला हवी. आणि हे सिद्ध करून दाखविले आहे ते श्रीमती संगीता वाल्मिक सांगळे (Farmer Success Story) या शेतकरी महिलेने.

लहानपणा पासून आई वडिलांसोबत शेती करताना संगीता यांना शेतीची आवड (Farmer Success Story)निर्माण झाली. पूर्वी ते पारंपरिक जसे ऊस, सोयाबीन, मका, कांदा यासारखी पिके घेत होते. परंतु वातावरणातील बदलामुळे त्यांनी पिकात सुद्धा बदल करण्याचे ठरविले.

सुरुवातीला त्यांनी अडीच एकरात पेरू लागवड केली त्यामध्ये आंतरपीक (Inter cropping)म्हणून कलिंगड, खरबूज, कोबी, फ्लॉवर अशी पिके घेतली.                                                              यानंतर ते वळले ते द्राक्ष लागवडीकडे. द्राक्ष शेती ही त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली, सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. विशेष म्हणजे ते द्राक्षाची निर्यात करतात.

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत त्यांनी 1 एकरात शेडनेट (Shade Net Farming) उभारले आहे. त्यात त्यांनी शिमला मिरची, काकडी, कोबी फ्लॉवर ही पिके घेतली.

त्यांच्या शेतात आंबा, चिकू, आवळा, सुपारी, केळी, लिंबू, संत्रा, नारळ अशा वेगवेगळ्या फळझाडांची (Fruit Farming) त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली आहे.

हिरवळीचे खत, गांडूळ खत, शेणखत (Organic Farming) यांचा वापर करून सेंद्रिय उत्पादने तयार करीत आहेत.

संगीता या कृषि विद्यापीठातील शिफारसीनुसार एकात्मिक पीक संरक्षणाचा (Integrated Crop Protection) वापर करतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी व कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव, बारामती येथे जाऊन वेळोवेळी संपर्क करून तेथील नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब त्या शेतात करतात. वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, मांजरी येथे भेटी देऊन कृषी विषयक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये केला आहे व परिसरातील शेतकर्‍यांना ही याबाबत जागृत केले आहे. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा (Drip irrigation) वापर करतात. फळपीकामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करतांना पेरू मध्ये भोपळा तर द्राक्षामध्ये ब्रोकोली या आंतरपिकाची लागवड करतात.

शेती करतांना मजूर आले नाही तर ट्रॅक्टर चालविणे, सारखी कामे त्या स्वत: करतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते देशी गायी पालन तसेच कुक्कुटपालन सारखे व्यवसाय सुद्धा त्या करत आहेत. यातून त्यांच्या घरच्या गरजा पूर्ण होतात असे त्या सांगतात. संगीता त्यांची शेती उत्पादने वेगवेगळ्या बाजारात विकतात, यातून त्यांना चांगला नफा (Farmer Success Story)मिळतो.

सन्मान आणि पुरस्कार (Farmer Success Story)

संगीता यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वेगवेगळी सन्मान आणि पुरस्कार लाभले आहे.

कृषी विभागाच्या जिजामाता कृषिभूषण पुरस्कार त्यांना लाभले आहे.

कृषिथॉन 2018 ला अभिनव महिला शेतकरी युवा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे

आत्मा तर्फे शेतकरी गट नोंदणी पुरस्कार सुद्धा त्यांना लाभला आहे.

जय किशन शेतकरी मंच तर्फे कृषी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संगीता या कृषी विद्या मंडळाच्या अध्यक्ष आहेत.

आवड असल्यास शेतीतून सुद्धा महिला वेगवेगळे प्रयोग करून चांगला नफा कमवू शकतात. आणि मन सन्मान मिळवू शकतात हे संगीता यांनी सिद्ध केले आहे.

error: Content is protected !!