Farmer Success Story: सेंद्रिय शेतकर्‍याने तयार केले, शेतीसाठी ‘बहुपयोगी नैसर्गिक फळ संजीवक’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: घरच्यांचा आणि नातेवाईकांचा विरोध (Farmer Success Story) झुगारून सेंद्रिय शेतीस सुरुवात करणाऱ्या एका शेतकर्‍याने स्वतःच्या प्रयत्नाने आणि अभ्यासाने शेतीसाठी बहुपयोगी असे नैसर्गिक फळ संजीवक (Natural Crop Hormone) तयार केले आहे.

या ध्येय वेड्या शेतकर्‍याचे नाव आहे विलास टेकळे. सोलापूर (Solapur) जिल्हा, मोहोळ तालुक्यातील पापरी गावाच्या या शेतकर्‍याला रासायनिक खताच्या धोक्याची जाणीव झाली. रासायनिक शेतीमुळे (Chemical Farming) पुढच्या पिढीला वेगवेगळ्या समस्येला सामोरा जावे लागणार आहे हे लक्षात येऊन त्यांनी 2012 साली सेंद्रिय शेतीला (Organic Farming) सुरुवात केली. यावेळी त्यांना बाहेरच्या लोकांकडूनच नाही तर घरातून सुद्धा विरोध झाला. परंतु हा विरोध पत्करून सुद्धा त्यांनी तीन गुंठ्यात कुटुंबासाठी परस बागेत सेंद्रिय भाजीपाला (Organic Vegetables) पिकवायला सुरुवात केली. यातून कुटुंबासाठी लागणारा सर्व भाजीपाला ते पिकवत आहेत.

सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन घेतले (Farmer Success Story)

शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी विशेषतः उसावरील रासायनिक खतांचा (Sugarcane Fertilizer) खर्च कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी सेंद्रिय शेतीची माहिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यासाठी त्यांना नाना नलगे आणि नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानुसार त्यांनी शेतात नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. परंतु, रासायनिक खतांचा वापर बंद केल्यावर पहिल्याच वर्षी उत्पादनात घट झाली, त्यामुळे कुटुंबियांसह अनेकांनी या शेती पद्धतीवर आक्षेप घेतला. पण तरीही सेंद्रिय शेतीच्या निर्णयावर ठाम राहून पुढे हळूहळू त्यांनी उत्पन्न वाढविले.

नैसर्गिक फळ संजीवकाची निर्मिती (Plant Hormones from Fruits)

विलास टेकळे यांनी तीन वर्षे अभ्यास करून नैसर्गिक फळ संजीवक तयार केले. गूळ आणि इतर वस्तू वापरून हे संजीवक तयार केले. या संजीवकाचा शेतीसाठी चांगला फायदा झाला. त्यांनी जेव्हा हे संजीवक त्यांच्या पिकांसाठी वापरले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पिकांच्या मुळ्यांची चांगली वाढ होऊ लागली आहे. फूल व फळ गळती (Fruit And Flower Drop) कमी झाली आणि फळांना तजेलदार रंग येऊ लागला. एवढेच नाही तर मिरचीवरील रोग (Chilly Diseases) गायब झाले.

विलास टेकळे सांगतात की त्यांनी तयार केलेले हे संजीवक नैसर्गिक असल्याने ते दीर्घकाळ टिकते. पिके, जमीन आणि जनावरांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. लवकरच या संजीवकाची व्यावसायिक विक्रीसाठी निर्मिती करण्याचा त्यांचा ध्येय आहे. या संजीवकामुळे इतर शेतकर्‍यांनाही फायदा व्हावा असे त्यांना वाटते.

विविध पुरस्कारांनी सन्मान (Farmer Success Story)                                                                         विलास टेकळे यांच्या सेंद्रिय शेतीत केलेल्या प्रयोगासाठी त्यांना विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत मोहोळ तालुका ‘सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेती’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. कृषी विभागा मार्फत इतर राज्यातही मार्गदर्शक म्हणून टेकळे यांची निवड झाली आहे.                                               

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ते शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांनी तयार केलेले संजीवक शेतकर्‍यांसाठी फायद्याचे ठरतेय. बचत गट चळवळीमार्फत त्यांनी परसबागेचा स्वत:वर विश्वास असल्यास शेतकरी कोणतेही ध्येय आणि यश मिळवू शकतो हे विलास टेकळे यांच्या यशोगाथा मधून आपल्याला समजते.

error: Content is protected !!