Farmer Success Story: ओसाड जमिनीत शेवग्याचे पीक घेतले; शेतकर्‍याने स्वत:चे रहाणीमान उंचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ब्लॉकमध्ये (Farmer Success Story) असलेल्या येल्डा हे अल्प विकसित गाव आहे. तेथे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध नाहीत. येथील बहुतेक लोक पारंपरिक शेती करतात. बहुतेक शेतकर्‍यांना त्यांच्या पिकातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करायचे त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणखी गरिबीकडे वळत होते.  आर्थिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर परिणाम होत होता.  

अशा परिस्थितीत 50 वर्षांचे शेतकरी श्रीपती चामनार (Shripati Chamnar) यांनी या अत्यंत  भीषण आव्हानांना तोंड देत पारंपरिक कापूस ऐवजी शेवगा लागवड केली आणि शेतीच्या दुष्टचक्रातून स्वत:ला बाहेर काढले (Farmer Success Story).

श्रीपती यांना पारंपरिक शेतीऐवजी शेतीत काहीतरी वेगळे, असामान्य करायचे होते. यादरम्यान श्रीपती यांना मानवलोक आणि सेव्ह इंडियन फार्मर्स (एसआयएफ) याबाबत माहिती मिळाली. या दोन्ही स्वयंसेवी संस्थांनी श्रीपती सारख्या अनेक शेतकर्‍यांना शेवग्याचे रोपे आणि आणि ठिबक सिंचन मिळवण्यासाठी मदत केली, जेणेकरून ते या परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकेल. औषधी उद्योगात शेवग्याला बाजारात खूप मागणी आहे. हीच कल्पना मनात ठेवून श्रीपती चामनार यांनी त्यांच्या एकेकाळच्या नापीक शेतात शेवग्याची शेती करायला सुरुवात केली.

 शेवग्याचे व्यवस्थापन (Drumstick Farming)

श्रीपतीने दोन एकरात 1600 शेवग्याच्या रोपांची लागवड केली. ही रोपे अनुक्रमे 10 x 6 फूट अंतरावर आणि 1×1 फूट खोलीवर पेरण्यात आली. जीवामृत, शेणखत यांचा वापर करून अतिरिक्त उत्पादन खर्च कमी केले. रोपे लागवडीपासून 6 महिन्यांनी शेवग्याचे उत्पादन सुरू झाले.

शेवग्याच्या पि‍काला कोणताही रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नाही. शेवग्याचे झाड कमी जागा, कमी पाणी आणि कमी खर्चात शेतकर्‍याला जास्त उत्पन्नाची हमी देते.

शेवग्याच्या वाढीसाठी कमी पाण्याची आवश्यकता असल्याने, हे पाण्याच्या दुर्मिळ प्रदेशात वाढण्यास योग्य पीक आहे. तसेच पिकांची वाढ करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करता येतो. एक अतिरिक्त फायदा म्हणजे वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान शेवग्याच्या शेंगा लवकर खराब होत नाही म्हणजे त्यांचे आयुष्य सुद्धा जास्त आहे.

श्रीपती हे रोपांना आठवड्यातून 5 ते 6 दिवस पाणी देतात आणि कापणी एका आठवड्यात होते. प्रत्येक शेवग्याची शेंग अंदाजे 2 ते 2.5 फूट आहे. अशा 5 ते 6 शेवग्याचे वजन अंदाजे 1 किलो असते. बाजारात त्याची किंमत 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याच शेवग्याच्या शेतात त्यांनी भेंडी, वांगे, टोमॅटो आणि मका ही आंतरपिके घेतात. हंगामात 4000 किलो शेवगा उत्पादनातून श्रीपतीला किमान दोन लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे (Farmer Success Story). कमी गुंतवणुकीत स्थिर उत्पन्न मिळवू मिळत असल्यामुळे त्यांच्या रहाणीमानात आणि जीवनात सुधारणा झाली.

मानवलोक अंबाजोगाई आणि सेव्ह इंडियन फार्मर्स (एसआयएफ) सारख्या सामाजिक कार्यासाठी समर्पित स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ओडिसा आणि मोरिंगा शेवग्याची रोपे आणि ठिबक सिंचन प्रणाली शेतकर्‍यांना मोफत वाटण्यात आली. या संधीचा उपयोग करून शेतकर्‍यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ओसाड जमिनीवर शेवग्याचे पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे (Farmer Success Story).

error: Content is protected !!