Farmer Success Story: उसापासून बनवलेली कुल्फी तुम्ही कधी खाल्ली आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या देशात असे अनेक शेतकरी (Farmer Success Story) आहेत जे काहीतरी नवीन प्रयोग करतात. त्यांचे हे प्रयोग एवढे भन्नाट असतात की ते लवकरच प्रसिद्धी मिळवतात. असाच एक प्रयोग दौंडमधील शेतकर्‍यांनी (Farmer Success Story) केलेला आहे.

आजपर्यंत उसापासून रस, साखर, गूळ आणि काकवी तयार होते हे आपल्याला माहित होते  परंतु उसापासून कुल्फी (Sugarcane kulfi) बनवलेली पाहीली आहे का? होय फक्त कुल्फीच नाही तर उसापासून कुल्फी, चटणी, बर्फ गोळा, जाम हे पदार्थ तयार करता येतात. आणि

हे सिध्द करून दाखविले आहे दौंड (Daund) तालुक्यातील शेतकर्‍यांच्या ग्रुपने. त्यांनी उसापासून कुल्फी आणि इतर पदार्थ बनवले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळे उपपदार्था ग्राहक मोठ्या चवीने खात आहेत.  

उन्हाळ्याला सुरुवात झाल्यावर अनेक लोक आईस्क्रीम आणि कुल्फीवर हमखास ताव मारताना दिसतात. हेच ओळखून 2023 साली त्यांना उसाच्या कुल्फीची कल्पना सुचली. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील 10 शेतकर्‍यांनी एकत्र येऊन ‘मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप’ बनवला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून हे शेतकरी उसापासून कुल्फी, चटणी, बर्फ गोळा, जाम तयार ( Sugarcane processing) करायला लागले. त्यांच्या या पदार्थांना लवकरच मागणी वाढली.

कोरोना काळात अनेकांनी आपले नवीन व्यवसाय सुरू केले. त्याप्रमाणे कोरोनानंतर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन उसाच्या कुल्फीचा व्यवसाय सुरू केला. कुल्फीला चांगली मागणी होती. दहा शेतकर्‍यांनी प्रत्येकी अर्धा एकर उसाची लागवड केली होती. त्यातून त्यांनी उपपदार्थ बनविले. उसाचा रस फ्रोजन करून ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला तर टनाला 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते परंतु त्यांना कुल्फी बनवल्या नंतर त्यांना 15 हजार रुपये प्रति टन दर मिळाला.

उसाच्या कुल्फीस ग्राहकांची पसंती (Farmer Success Story)

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसापासून बनवलेली कुल्फी ही ग्राहकांच्या पसंतीस उतरली. दररोज 1000 ते 1200 कुल्फी विकल्या गेल्या. अष्टविनायक रस्त्यालगत आऊटलेट असल्याने भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात  त्यांचे ग्राहक बनले होते. उसाची कुल्फी पहिल्यांदा ऐकल्याने लोक उत्सुकतेने येथे थांबून कुल्फीचा आस्वाद घेत असत. उसापासून बनवलेली ही कुल्फी आरोग्यदायी असल्याने सुद्धा मागणी वाढत होती. कुल्फीची किंमत देखील त्यांनी फक्त 10 रुपये ठेवली होती. यासाठी लागणारी मशिनरी ही आयआयटी मुंबई मधून आणण्यात आली आहे.

ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकते. ग्रुपमधील शेतकर्‍यांना रोजचे हजार रुपये मिळाले. अनेकदा ऊस कारखान्याला जात नाही म्हणून शेतकरी ऊस पेटवून कारखान्याला घालवतात. त्यामध्ये शेतकर्‍यांचे मोठं नुकसान होतं. आपल्या आजूबाजूला अनेक संधी असतात, गरज आहे ती फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकर्‍यांनी त्यांच्या वेगळ्या कल्पनेतून (Farmer Success Story) हे सिद्ध केल आहे.

error: Content is protected !!