Farmer Suicide : दमदाटीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; पुणे पोलिसांकडून तिघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमधील वाद हे काही नवीन नसतात. मात्र, जमिनीच्या या ना.. त्या कारणाने शेतकऱ्यांमधील वाद (Farmer Suicide) नेहमी सुरूच असतात. मात्र, आता याच जमिनीच्या वादामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हनुमंत सणस (वय 60 वर्ष) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतीवर अन्य शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे शेतकरी हनुमंत सणस यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करणाऱ्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला असून, त्यात आत्महत्या करण्याच्या कारणाचा उल्लेख केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? (Farmer Suicide In Pune)

हनुमंत सणस या शेतकऱ्याने स्थानिक शेतकरी, पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचे म्हटले आहे. बारामती तालुक्यातील लाटे गावात हनुमंत सणस यांची गट क्रमांक 141 मध्ये नीरा नदीला लागूनच शेती आहे. या भागातून पाणी उचलण्याची परवानगी नसतानाही आठ शेतकऱ्यांनी सणस यांच्या जमिनीवर महावितरणकडून वीज जोडणी मिळवली होती. त्यामुळे पाण्यासाठी हे शेतकरी सणस यांच्या जागेवरून ये-जा करत होते.

पोलिसांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष

सणस हे अनेक दिवस त्यांना मज्जाव करत होते. मात्र, हे शेतकरी सणस यांना दम देत होते. या विरोधात हनुमंत सणस यांनी पोलिसात तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पोलिसांनी उलट त्यांनाच दम दिला होता. ज्यामुळे अखेर स्थानिक शेतकरी, पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून सणस आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे हनुमंत यांचे वय हे 60 वर्षांहून अधिक होते. त्यांचा मुलगा आणि भावालाही हे शेतकरी दमबाजी करत होते.

तीन शेतकऱ्यांना अटक

याप्रकरणी शेतकरी हनुमंत सणस यांचे बंधू जयवंत सणस यांनी वडगाव निंबाळकर स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. हनुमंत सणस यांनी आतमहत्येपूर्वी बनवलेला मोबाईलमधील व्हिडिओचा आधार घेत आणि त्यांचे बंधू जयवंत सणस यांच्या तक्रारीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी अभिजित उर्फ सोपान घुले, अमर दत्तात्रय दुधाणे, मोहन उर्फ बजरंग शंकर कोळेकर, संभाजी महादेव खलाटे, प्रकाश बाबुलाल माने (तिघे रा. लाटे, ता. बारामती) यांच्या विरुद्ध शिवीगाळ, धमकाविणे, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

error: Content is protected !!