Farmers Bull : 18 वर्ष शेतीमध्ये अविरत सेवा; शेतकऱ्याने घातला लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि त्याचा जिवलग असलेला बैल (Farmers Bull) या दोघांचे नाते शब्दात व्यक्त करणे शक्‍यच नाहीये. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबती असतो. बैलांचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी देखील बैलांचा वापर केला जातो. तसेच शेतकरी आणि बैलाचे (Farmers Bull) असणारे नाते आणखी घट्ट करण्यासाठी त्यास विविध सणांना महत्व दिले जाते.

18 वर्ष शेतीमध्ये अविरत सेवा (Farmers Bull)

मात्र, आता एखाद्या बैलाने अविरतपणे एखाद्या शेतकऱ्याकडे (Farmers Bull) 18 वर्ष राहून त्याची मदत केली असेल तर त्या दोघांमधील नाते हे काय असेल? हे वेगळे सांगायला नको. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथील चौधरी परिवाराच्या 18 वर्ष शेतीत काम केलेल्या राजा बैलाचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या राजा बैलाचा दशक्रिया करून, त्याच्या 18 वर्षांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कोरडवाहू शेतीतुन प्रगती

आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक आणि कोरडवाहू गाव म्हणून शिरदाळे गावची ओळख आहे. परंतु या कोरडवाहू शेतीमध्ये जर नियोजनबद्ध शेती केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देणारी काही मोजकी कुटुंबे आहेत. त्यातील एक कुटुंब म्हणजे शांताराम चौधरी, बाबाजी चौधरी, राजू चौधरी, शंकर चौधरी यांचे कुटुंबही आहे. या कुटुंबातील दोन महिलांना गावचे सरपंच म्हणून नेतृत्व करण्याची संधी देखील गावाने दिली. विजया बाबाजी चौधरी, सुनीता राजेंद्र चौधरी यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम काम केले.

सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन

याच कुटुंबात दहा दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली आणि ती म्हणजे या कुटुंबाची तब्बल अठरा वर्षे सेवा केलेल्या ‘राजा’ या बैलाचे निधन झाले. ज्या बैलाने आपली अठरा वर्षे सेवा केली. त्याच्याप्रती काहीतरी स्मृती जपायच्या म्हणून चौधरी कुटुंबाने या बैलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार सकाळी भजन कीर्तनासह राजा बैलाचे प्रतिमापूजन करण्यात झाले. तसेच उपस्थित सर्वांनीच राजा बैलाला शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित सर्वांसाठी जेवण अर्थात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!