Farmers Bull : रसवंतीमध्ये मशीनला घुंगरू का बांधतात? वाचा…कसाय त्याचा शेतकऱ्यांशी संबंध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून, उकाड्याने सर्वच त्रस्त (Farmers Bull) आहेत. अनेकदा प्रवासादरम्यान किंवा बाजारात गेल्यानंतर रस्त्यात रसवंती गृह दिसल्यास आपली पावले आपसूकच त्याच्याकडे वळतात. मग थंडगार उसाचा रस पिऊन तृप्त झाल्यासारखे वाटते. रसवंती गृहामध्ये गेल्यावर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू बांधले जातात. पण उसाच्या मशीनचा आणि त्यावर लावलेल्या घुंगरांचा नेमका संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर आज आपण एक शेतकरी (Farmers Bull) म्हणून त्या घुंगराचे काय महत्व असते. याबाबत जाणून घेणार आहोत.

अनेकांना नेहमी पडतो प्रश्न (Farmers Bull Sugarcane Juice Machines)

उन्हाळ्यात उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेण्याचे काम करत असतो. तसेच उसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे सुद्धा आहेत. रसवंती गृहांमध्ये गेल्यावर तुम्ही मशीनमधून निघणारा छुमछुम हा आवाज ऐकलाच असेल. विजेवर चालणाऱ्या मशीनला बांधलेलया घुंगरांमधून येणारा हा आवाज ऐकल्यावर नेमका मशीन आणि घुंगरांचा (Farmers Bull) काय संबंध असावा? असा प्रश्न अनेकांना उसाचा रस पिण्यासाठी गेल्यावर पडतो.

शेतकऱ्यांची बैलाशी भावनिक नाळ

तर यामागचे कारण हे रसवंती गृह चालकांच्या कृतज्ञतेच्या भावनेशी जोडलेला आहे. पूर्वीच्या काळी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढला जायचा. आजही काही दुर्गम भागात उसाचा रस काढण्यासाठी लाकडी घाण्याचा वापर केला जातो. पण काळानुरुप या व्यवसायात बदल झाले आणि शहरी भागात उसाचा रस काढण्यासाठी बैलांच्या लाकडी घाण्याची जागा लोखंडी मशीन्सने घेतली. परंतू या बैलांनी आपल्याला एकेकाळी रसवंतीच्या माध्यमातून जगवलेले आहे. याची आठवण या ठिकठिकाणी रसवंती गृह चालवणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आजही विसरू दिली नाही. हेच त्यामागील कारण आहे.

बैल आणि शेतकऱ्यांचे नाते अवर्णनीय

खरे तर शेतकरी आणि त्याचा जिवलग असलेला बैल या दोघांचे नाते शब्दात व्यक्त करणे शक्‍यच नाहीये. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबतीच, बैलाचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी तसेच शेतकरी आणि बैलाचे असणारे नाते आणखी घट्ट करण्यासाठी अनेक प्रकारे केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पूर्वी रसवंतीसाठी बैलाचा वापर होत होता. जो काही ठिकाणी आजही पाहायला मिळतो.

error: Content is protected !!