Farmers Compensation : ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील वर्षी 2023 च्या खरीप हंगामात (Farmers Compensation) एक महिना उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर त्यानंतर जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या पावसाने अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. याउलट मराठवाडा विभागात मात्र, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. विशेषकरून बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmers Compensation) 6 कोटी 47 लाख 41 हजार रुपये निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत जीआर (शासन निर्णय) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

7549 हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Farmers Compensation In Buldhana)

मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके खराब झाली होती. तर काही भागांमध्ये पिके पुराच्या पाण्याखाली गेली होती. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील 7 हजार 899 शेतकऱ्यांच्या 7 हजार 549.55 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची (Farmers Compensation) मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून आर्थिक मदतीच्या निधी मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानुसार, राज्य आपत्ती निवारण निधीतुन शेतकऱ्यांना 6 कोटी 47 लाख 41 हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

3 हेक्टरपर्यंत मिळणार मदत

शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठीची ही मदत प्रामुख्याने प्रति शेतकरी 3 हेक्टरसाठी मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासांत 65 मिमीपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास, ही मदत दिली जाणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही. असेही राज्य सरकारच्या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402291357219419.pdf)

error: Content is protected !!