Farmers Daughter : शेतकऱ्याने मुलीला पाठवले हेलिकॉप्टरने सासरी; अनोख्या लग्नाची सर्वदूर चर्चा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने (Farmers Daughter) जनावरांसह मनुष्यबळाच्या मदतीने शेतीत अधिक कष्ट घ्यावे लागत होते. त्यातून त्यांना खूपच कमी उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेती क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलले आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान काहीसे उंचावले आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नानंतर तिला चक्क हेलिकॉप्टरमधून तिच्या सासरी पाठवल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलीचे (Farmers Daughter) लग्न नेहमी आठवणीत राहावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

काहीतरी हटके करण्याचा चंग (Farmers Daughter Marriage Helicopter)

हरियाणातील रेवारी या जिल्ह्यातील उदयवीर पटेल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी नुकताच आपल्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला. मात्र विवाहात सर्वच लोक खर्च करतात. आपल्या मुलीचे लग्न गावात आणि नातेवाईकांच्या कायम आठवणीत राहावे. यासाठी शेतकरी उदयवीर पटेल यांनी आपल्या मुलीच्या विवाहात (Farmers Daughter) काहीतरी हटके करण्याचे मनी निश्चित केले होते. अशातच लग्नाच्या तयारीदरम्यान मुलाकडील मंडळींनी नवरीला नवरदेवासोबत हेलिकॉप्टरने सासरी पाठवण्याची मागणी केली. शेतकरी उदयवीर पटेल यांनी मुलाकडील मंडळींची ही मागणी अगदी आनंदात मान्य केली. त्यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झाल्याचे ते सांगतात.

6 मार्चला झाला विवाह

रेवारी जिल्ह्यातील शेतकरी उदयवीर पटेल यांची मुलगी प्रिया कुमारी हिचा विवाह गुरुग्राम जिल्ह्यातील बार गुर्जर गावचे सरपंच रामबीर यांचा मुलगा योगेश याच्यासोबत 6 मार्च 2024 रोजी पार पडला. सर्व विधी आणि परंपरानुसार शेतकरी उदयवीर पटेल यांच्या मुलीचे लग्न संपन्न झाले. अशातच ठरल्याप्रमाणे त्यांनी मुलीला सासरी पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरसह, हेलिपॅडची तयारी करून ठेवली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास उदयवीर यांनी आपल्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसवून दिले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

‘शेतकरी कमजोर नाही’

शेतकरी उदयवीर पटेल सांगतात, “आपल्या मुलीच्या अनोख्या पद्धतीने झालेल्या या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. इतकेच नाही तर आपल्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक एकवटले होते.” उदयवीर यांनी शेवटी म्हटले आहे की, “आजच्या काळात देशातील शेतकरी कमजोर नाहीये. कष्टाने तो नंदनवन फुलवू शकतो. फक्त शेतीमध्ये त्याला बाजारभावाची साथ आणि योग्य गोष्टींची उपलब्धता असणे आवश्यक आहे. असे झाल्यास देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही”

error: Content is protected !!