Farmers Day : आज शेतकरी दिवस! वाचा… काय आहे नेमका इतिहास?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक शेतकरी नेते होऊन गेले आणि आजही आहेत. मात्र देशातील शेतकरी (Farmers Day) आपला कैवारी म्हणून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मानत होते. चौधरी चरण सिंह हे भलेही पंतप्रधान राहिले, मात्र आजही एक शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या विषयी एक वेगळीच आस्था आहे. यामुळेच 2001 पासून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्म दिवस देशात ‘शेतकरी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शेती क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देशभरात दरवर्षी 23 डिसेंबर रोजी ‘शेतकरी दिवस’ (Farmers Day) साजरा केला जातो.

चौधरी चरण सिंह यांचा परिचय (Farmers Day Celebrates In India)

23 डिसेंबर 1902 रोजी चौधरी चरण सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्हयात मध्यमवर्गीय शेतकरी (Farmers Day) कुटुंबात झाला होता. ते 1979-1980 या काळात देशाचे पंतप्रधान राहिले होते. या केवळ वर्षभराच्या आपल्या पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनुकूल अशा जमीन सुधारणा नितींचा अवलंब केला होता. याच सुधारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये त्याची आज एक वेगळी ओळख आहे.

देशाचे पंतप्रधान म्हणून अल्प कालावधीत चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी (Farmers Day) कठोर परिश्रम घेतले. सावकार आणि त्यांच्या अत्याचारांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी 1939 मध्ये कर्जमुक्ती विधेयक आणले. आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनाही सुरू केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी आजही जोखाडातून बाहेर काढण्याचे काम करत आहेत. तर 1962-63 मध्ये त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा अवलंब केल्यामुळे शेतकरी त्यांना आपला नेता मानत होते.

चौधरी चरणसिंह हे एक अतिशय यशस्वी लेखक होते आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल (Farmers Day) त्यांचे विचार मांडले गेले. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपायांच्या स्वरूपात खूप प्रयत्न केले.चौधरी चरणसिंह हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे भारताचे माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले.

error: Content is protected !!